राम सातपुतेंकडून आचारसंहिता भंग, भाजप आणि निवडणूक आयोगाला कारवाईचे अधिकार : कुमार आशिर्वाद (जिल्हाधिकारी)
भाजप विरोधी मतदानासाठी मशिदीमधून फतवे बाहेर पडत असल्याचे वक्तव्य सोलापुरातील भाजप उमेदवार आमदार राम सातपुते यांनी केले होते. लोकसभा निवडणुकी दरम्यान या वक्तव्यामुळे आदर्श आचारसंहितेचा भंग झाला आहे. या प्रकरणी पक्ष म्हणून तुम्ही कारवाई करा, अशा स्वरुपाचे पत्र जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठविले आहे.
आमदार राम सातपुते यांच्या या वक्तव्यामुळे आचारसंहितेचा भंग झाल्याची तक्रार जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाली होती. या तक्रारीवर जिल्हाधिकारी तथा सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी
निवडणूक आयोगाला अहवाल पाठविला होता. आयोगाने याप्रकरणात पुन्हा चौकशी करून अहवाल पुन्हा सादर करण्याचे आदेश निवडणूक निर्णय अधिकारी आशीर्वाद यांना दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी या प्रकरणात पुन्हा चौकशी करून. आचारसंहिता भंग झाली असल्याचाच अहवाल पाठविला आहे.
आचारसंहिता भंग झाल्याने या प्रकरणात कारवाई करण्याचे अधिकार हे उमेदवार ज्या पक्षाचा आहे, त्या पक्षाच्या अध्यक्षाला व निवडणूक आयोगाला आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे व निवडणूक आयोगाला अहवाल पाठविला आहे. या अहवालावर आता पक्ष म्हणून भाजप आमदार राम सातपुते यांच्या वर काय कारवाई करणार, निवडणूक आयोग काय कारवाई करणार? याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.