महाराष्ट्रराजकीयलोकसभा बातमी 2024सोलापूर बातमी
जुबेर कुरेशी सह मंजूर मामा आणि इतर कार्यकर्त्यांवर आणि पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल
सोलापुरात काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांच्या समर्थनार्थ 4 जून रोजी मोटारसायकलवर रॅली काढण्यात आली होती.ही रॅली विजापूर वेस,बारा इमाम चौक,कीडवाई चौक ते काँग्रेस भवनदरम्यान काढण्यात आली होती.
खासदार प्रणिती शिंदेच्या समर्थनार्थ रॅली काढण्यासाठी सोलापूर पोलिसांकडून कोणत्याही प्रकारची परवानगी नव्हती.जेलरोड पोलिसांनी 6 जून रोजी सर्व तपास करत गुन्हा दाखल केला आहे.जेलरोड पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई अर्षद मुजावर यांनी फिर्याद दिली आहे.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेसचे नेते जुबेर कुरेशी,मैनोद्दीन हतूरे,फरदिन सलीम शेख,लालसाब जलालसाब सिंदगीकर,मंजूर बागवान उर्फ मंजूर मामा,महंमद अवेस मर्चंट,अनिष खान,अयाज दीना मेम्बर व इतर 25 ते 30 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.