Solapur court matterन्यायालय निर्णयसोलापूर बातमी

प्रेमात अडसर ठरणाऱ्या डॉक्टर वर कोयत्याने हल्ला केल्याच्या आरोपातून माजी नगरसेवक गाझी जहागीरदार यांची निर्दोष मुक्तता – अँड रियाज एन. शेख

यात घटनेची थोडक्यात हाकिकत अशी की- दिनांक ७ नोव्हेंबर 2013 रोजी फिर्यादी डॉक्टर फारूक नजीर महागामी राहणार- सोलापूर हे त्यांचे बसवनगर येथील दवाखाना बंद करून विजापूर सोलापूर रोड ने सोलापूरच्या दिशेने येत असताना रात्री 10:45 वाजण्याच्या सुमारास देशमुख वस्ती जवळ आले असताना पाठीमागून एका दुचाकी मोटरसायकलवर माजी नगरसेवक गाझी जहागीरदार व इतर दोघे यांनी फिर्यादीला अडवून त्यास तू माझ्या प्रेम प्रकरणांमध्ये मध्ये का येतो असा जाब विचारून हातातील ऊस तोडण्याच्या कोयत्याने फिर्यादीच्या डोक्यात वार करून त्यास गंभीर जखमी करून त्यांना बाजूस असलेल्या झुडपामध्ये फेकून निघून गेले होते. त्यानंतर फिर्यादी यांनी मोबाईल वरून सदरची घटना त्यांचे बंधूंना कळवून व पुढील उपचाराकरिता दवाखान्यांमध्ये जाऊन त्यानंतर मंद्रूप पोलीस स्टेशन येथे माजी नगरसेवक गाजी जागीरदार यांच्या विरुद्ध व त्यांच्या २ साथीदारांच्या विरुद्ध फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल झाला होता, सदर गुन्ह्याचा तपास करून पोलिसांनी सोलापूर येथील न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

सदर खटल्याची सुनावणी सोलापूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती आर के जंगम साहेब यांच्या कोर्टामध्ये झाली, प्रस्तुत खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे फिर्यादी, पंच, फिर्यादीला जखमीला तपासणारे डॉक्टर, तपासी अधिकारी असे एकूण ५ साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आलेले होते. सदर खटल्याच्या अंतिम युक्तीवादावेळी आरोपी माजी नगरसेवक गाझी जहागीरदार यांच्या वतीने युक्तिवाद करत असताना एडवोकेट रियाज शेख यांनी आरोपी विरुद्ध खोटी केस केलेली आहे, कोणताही नेत्र साक्षीदार मिळून आलेला नाही, तपासामध्ये घटनास्थळ पंचनामांमध्ये व फिर्यादी जबाब मध्ये तफावत आहे, फिर्याद उशिराने दाखल झालेली आहे, आरोपीचे प्रेम संबंध असल्याचे सबळ पुरावे निर्माण कोर्टामध्ये सादर करण्यात आलेले नाही, साक्षीदारांनी त्यांच्या साक्षीमध्ये दिलेला जबाब हा विसंगती निर्माण करतो व घटना घडल्या बाबत संशय निर्माण करणारा आहे, घडलेल्या घटनेबाबत स्पष्ट पुरावा आरोपीनेच मारल्याचे दिसून येत नसल्याने आरोपीस निर्दोष मुक्तता करावी असा युक्तिवाद केला. सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती आर के जंगम यांनी माजी नगरसेवक गाझी जहागीरदार यांना सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश पारित केले.

सदर खटल्यामध्ये आरोपी माजी नगरसेवक गाझी जहागीरदार यांच्या तर्फे अॅड रियाज एन. शेख यांनी तर सरकार पक्षा तर्फे अॅड माधुरी पाटील यांनी काम पाहिले.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel