Solapur court matterक्राईमन्यायालय निर्णयसोलापूर क्राईमसोलापूर बातमी

सोलापुरातील नगरसेवक तौफिक हत्तूरे निर्दोष….

पोलीस चौकीत घुसून फौजदारास धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी काँग्रेसचे मा. नगरसेवक तौफिक हत्तुरे सह तिघांची निर्दोष मुक्तता :- अॅड. रियाज एन. शेख

सोलापूर शहरातील बेगम पेठ पोलीस चौकी मध्ये तक्रार देण्यासाठी आलेल्या महिलेची पोलीस चौकशी करीत असताना काँग्रेसचे तत्कालीन नगरसेवक तौफिक बाबुमिया हत्तुरे, अजरुद्दीन इसाक हत्तुरे, मोहसीन गुलाबसाब मैंदर्गीकर, शरीफ मकबूल बागवान उर्फ कॅडो यांनी चौकीमध्ये येऊन आमच्या मुलांना चौकीत का आणले असे म्हणून वाद घालून पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रेय भीमराव लिगाडे यांच्याशी हुजत घालून त्यांच्या युनिफॉर्मची गच्ची धरून त्यांना ढकलून देऊन त्यांच्या हातातील वॉकी टॉकी ओढा- ओढ करून त्याचे एरियल तोडून नुकसान करून सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यामधून सोलापूर येथील सत्र न्यायाधीश श्री. योगेश राणे साहेब यांनी दिले निर्दोष मुक्तता केली.

यात घटनेची थोडक्यात हाकिकत अशी आहे की,

दिनांक 22 ऑक्टोबर 2018 रोजी सायंकाळी ८ वाजण्याच्या सुमारास बेगम पेठ पोलीस चौकी समोर तक्रार चालू
असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रेय लिगाडे यांना मिळाली त्याप्रमाणे ते पोलीस चौकीमध्ये गेले असता बेगम पेठ पोलीस चौकीमध्ये १ महिला व ५ मुले होती. त्यावेळी चौकी अंमलदार पोलीस नाईक चव्हाण यांना पीएसआय लिगाडे यांनी विचारणा केली असता चौकीमध्ये आलेली महिला ही तिच्या भावासोबत खरेदी करण्यासाठी जात असताना सलमान सातखेड व रईस बागवान या दोघांनी सदर महिलेचा मोटरसायकल वरून पाठलाग करून तिला पैसे दाखवून इशारा केला व गाडी आडवी लावून शिवीगाळ करून मारहाण केल्याची तक्रार असल्याने सदर दोन्ही मुलांना पोलीस चौकीत बसविले आहे असे सांगितले.

त्यानंतर पीएसआय लिगाडे हे सदर महिलेकडे विचारपूस व चौकशी करीत असताना त्या ठिकाणी काँग्रेसचे तत्कालीन नगरसेवक तौफिक बाबुमिया हत्तुरे, अझरुद्दीन इसाक हत्तुरे, मोहसीन गुलाब मैंदर्गीकर, शरीफ मकबूल बागवान उर्फ कॅडो असे ४ जण बेगम पेठ चौकीमध्ये आले. त्यावेळी नगरसेवक तौफिक हस्तुरे यांनी पीएसआय लिगाडे यांना उद्देशून “तुम्ही आमच्या मुलांना चौकीत का” आणले असे म्हणून वाद घालू लागले. त्यावेळी पीएसआय लिगाडे यांनी महिलेच्या बाबतीत प्रकार घडलेला आहे आमची चौकशी चालू आहे तुम्ही थांबा असे म्हणाल्यानंतर नगरसेवक तौफिक हत्तुरे यांनी तू मुझे पहचानता नही क्या, मै यहा का नगरसेवक हू, हमारे बच्चों को छोड़ दे असे म्हणून नगरसेवक तौफिक हत्तुरे व त्यांच्यासोबत आलेले ३ जणांनी चौकीत बसविलेल्या सलमान सातखेड व रईस बागवान यांना चौकी बाहेर घेऊन जाऊ लागले. त्याच वेळेस पीएसआय लिगाडे यांनी तौफिक हत्तुरे यांना मेंबर आपण बसून घ्या आम्हाला महिलेची तक्रार ऐकून घेऊ द्या, असे सांगत असताना नगरसेवक तौफिक हत्तुरे यांनी पीएसआय लिगाडे यांना “तेरे मा की, तेरे को देखता” असे म्हणून पीएसआय लिगाडे यांच्या युनिफॉर्मची गच्ची धरून ढकलून दिले. त्यावेळी चौकीच्या इतर कर्मचाऱ्यांनी देखील त्यांना चौकी बाहेर थांबण्यास सांगितले असताना ते वाद करू लागले. सदरच्या घडलेल्या प्रकाराबाबत पीएसआय लिगाडे यांनी त्यांच्याकडे असलेल्या वॉकी टॉकी वरून नियंत्रण कक्षास कळविले. त्यावेळी नगरसेवक तौफिक हत्तुरे याने ‘तुने किस को बताया, वो क्या करने वाले है” असे म्हणून वॉकी टॉकी ओढा ओढ केली व त्यामुळे वॉकी टॉकीचे एरियल तुटून पाचशे रुपये चे नुकसान झाले तसेच पीएसआय लिगाडे यांना ढकलून दिल्याने त्यांच्या उजव्या हाताच्या कोपऱ्यात, डाव्या पायाच्या घोट्याजवळ व छातीस मुक्कामार लागला होता.

सदर नगरसेवक तौफिक हत्तुरे व त्यांच्या ३ साथीदारांनी पोलीस चौकीमध्ये येऊन सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रेय भीमराव लिगाडे यांनी जेलरोड पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली होती. सदर फिर्यादीवरून नगरसेवक तौफिक हत्तुरे व त्यांच्या इतर ३ साथीदारांच्या विरुद्ध जेलरोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 468/2018 भा.द.वि कलम 353, 332, 225, 504, 506, 427, 34 अन्वय गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्याचा तपास करून सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित धन्यकुमार दिवसे यांनी सोलापूर येथील न्यायालयामध्ये दोषारोपपत्र सादर केले होते.

सदर खटल्याची सुनावणी सोलापूर येथील सत्र न्यायाधीश श्री योगेश राणे साहेब यांच्या कोर्टामध्ये झाली. सदर खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे फिर्यादी पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय लिगाडे, चौकी अमलदार प्रवीण चव्हाण, पोलीस निरीक्षक राम अभंगराव, पंच साक्षीदार तसेच तपासी अधिकारी अशा एकूण ७ जणांची साक्ष नोंदविण्यात आली होती. सदर खटल्याच्या अंतिम युक्तीवादावेळी आरोपीतर्फे अॅड. रियाज शेख यांनी पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल केलेला आहे, घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या लोकांचे जबाब नोंदविले नाही, नगरसेवक तौफिक हत्तुरे यांचा सरकारी कामात अडथळा करण्याचा कोणताही हेतू दिसून येत नाही, फिर्याद देण्यास झालेला उशीर व पंचनामा करण्यास झालेला उशीर हा संशय निर्माण करतो, नगरसेवक तौफिक हत्तुरे हे शांतता कमिटीचे सदस्य या नात्याने चौकीत गेले होते व विचारपूस करत होते परंतु पोलिसांनी त्याचा गैरसमज करून घेऊन खोटी फिर्याद दिली आहे, तसेच साक्षीदारांच्या जबाब मधील विसंगती तसेच सबळ पुरावा नसल्याचे मेहरबान न्यायालयाचे निदर्शनास आणून दिले. सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून सत्र न्यायाधीश श्री योगेश राणे साहेब यांनी नगरसेवक तौफिक बाबुमिया हत्तुरे यांच्यासह तिघांची निर्दोष मुक्तता
करण्याचे आदेश पारित केले.

सदर खटल्यामध्ये आरोपीतर्फे अॅड रियाज शेख यांनी तर सरकार पक्षातर्फे अॅड. दत्तूसिंग पवार यांनी काम पाहिले

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel