शहर मध्य’ मध्ये रियाज सय्यद इच्छुक, काँग्रेसकडे केली मागणी
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सोलापूर शहर काँग्रेसने इच्छुक उमेदवाराचे अर्ज मागविले आहेत. या अर्जासाठी २० हजाराचे डिपॉझिट ठेवण्यात आले आहे. डिपॉझिट
भरून इच्छुक त्यांच्या आवडीच्या मतदारसंघातून उमेदवारी मागणी करू शकतात. त्यानंतर संकलित झालेले हे उमेदवारी अर्ज काँग्रेसच्या वरिष्ठ कमिटीकडे पाठवण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने सोलापूर शहर मध्य विधानसभेसाठी वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे अध्यक्ष रियाज सय्यद यांनी इच्छुक उमेदवारी अर्ज शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या कडे काँग्रेस भवन येथे सादर केला आहे. वेळी शंकर राऊत, रमेश बनसोडे, मुन्ना भाई बेलीफ, राशीद शेख, इम्रान शेख,अल्लाहबक्ष शेख, मुन्ना नदाफ, जुबेर बागवान, अल्ताफ भाई पटेल आधी जण उपस्थित होते.
रियाज सय्यद यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसमध्ये प्रवेश करून खा. प्रणिती शिंदे यांच्या निवडणुक प्रचारात सक्रिय सहभाग घेतला होता. रियाज सय्यद यांनी स्थापन केलेल्या वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या सोलापूरात जवळपास दहा ते पंधरा हजार वाहतूकदार सभासद आहेत. सय्यद यांनी साद हॉस्पिटलच्या माध्यमातून गोरगरिब रुग्णांना अल्पदरात उपचार करत आहेत. शहरातील विविध भागात साद ओपीडीत दहा रुपयात रुग्णांची तपासणी व औषध उपचार केले जाते. यामुळे रियाज सय्यद यांनी अल्पावधीत मोठी लोकप्रियता मिळवली आहे. त्यांच्या इच्छुक अर्जाचा काँग्रेस पक्ष नक्कीच विचार करेन असा विश्वास यांच्या समर्थकांना आहे.