सोलापूर बातमीमहाराष्ट्रसोलापूर सामाजिक

बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियन औरंगाबाद सोलापूर युनिट तर्फे महिला दिन साजरा करण्यात आला…

त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर अस्मिता बालगावकर ह्या उपस्थितीत होत्या त्यांनी आपल्या मनोगतात महिलांची सुरक्षितता व त्यांचे सक्षमीकरण या विषयावर त्यांनी प्रबोधन केले आजच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान जीवनाकडे आजच्या महिलांनी सजगपणे व जागृती पणे सामोरे जावे असा सल्लाही दिला आजच्या तंत्रज्ञानाच्या या दुनियेत आपल्याला रोजंदिनी हा जीवनाचा भाग झाला आहे त्याचबरोबर आपली सुरक्षितता जपण्यासाठी विविध शॉपिंग अँप वरून आपण प्रॉडक्ट खरेदी करू शकतो. जसे की स्टंट गन, पेपर स्प्रे, अलार्म किचन, कार्ड नाईफ यासारखे खूपसे प्रॉडक्ट्स आपण शॉपिंग ॲप मधून खरेदी करू शकतो आणि त्याचा आपल्या जीवनामध्ये वापर देखील करू शकतो याने कोणत्या प्रकारची इजा होत नाही पण वेळप्रसंगी आपल्याला याचा खूपसा फायदा होतो आपण आपल्या बँकेची कामे सांभाळून त्याचबरोबर आपल्या घराचेही प्रतिनिधित्व करतच असतो हे कौतुकाचे आहे आणि हा कौतुकाचा सन्मान देखील व्हावा हीच एक महिला म्हणून अपेक्षा असते ती समाजातून आणि आपल्या कुटुंबात घडत असते.
या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून कॉम्रेड सरिता कुलकर्णी ह्या होत्या त्याचबरोबर वुमन्स कौन्सिलच्या कॉम्रेड शिल्पा कुलकर्णी व ऑर्गनायझिक सेक्रेटरी म्हणून कॉम्रेड संतोष चित्त्याळकर हे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॉम्रेड सुजाता होंडरे तर आभार प्रदर्शन कॉम्रेड श्रीदेवी मेनगुळे यांनी केले या कार्यक्रमाप्रसंगी बँक ऑफ महाराष्ट्र त्याचबरोबर इतर सर्व बँकेच्या कर्मचारी अधिकारी वर्गातील महिला या बहुसंख्येने उपस्थित होत्या त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या नातलगातील मुली आणि महिला कर्मचारी यांचे मनोरंजनाचे कार्यक्रम देखील सादरीकरण करण्यात आले व त्यांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्यात आले व त्यांच्या सत्कार सन्मान ही करण्यात आली.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel