समाजातील वास्तव चित्र दाखविण्याचे काम फोटोग्राफर करत असतात :- प्रणितीताई शिंदे
सोलापूर शहर काँग्रेस D ब्लॉक चे अध्यक्ष देवाभाऊ गायकवाड यांच्या तर्फे छायाचित्रकार दिन निमित्त फोटोग्राफर व VDO फोटोग्राफर यांचा सपत्नीक सत्कार खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या हस्ते सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे यांच्या अध्यक्षतेखाली हॉटेल कामत येथील सभागृहात करण्यात आला.
याप्रसंगी प्रणितीताई शिंदे आपले विचार व्यक्त करताना म्हणाले की, वंचित, पीडित, समाजातील वास्तव चित्र, सत्य परिस्थिती दाखविण्याचे काम फोटोग्राफर करत असतात. जगाची दुसरी बाजू फोटोच्या माध्यमातून दाखविण्याचे काम फोटोग्राफर करत असतात. त्यांना कायम अलर्ट रहावे फोटो काढण्यासाठी कुठल्याही क्षणी कुठल्याही ठिकाणी जावे लागते. अवघड प्रसंग टिपण्यासाठी जीवाची बाजी लावावी लागते. असे म्हणतात एक फोटो हजार शब्दांप्रमाणे असते. त्यांना त्यांचा घरातील कुटुंबाचा पाठींबा आल्यामुळेच हे करू शकतात.
आज राज्यात देशात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत, लहान मुलींचा विचार न करता हे नराधम अत्याचार करत आहेत. म्हणून आज प्रत्येक घरात आपल्या मुलांना महिलांचा आदर, मान सन्मान देणे आणि संस्कार शिकवायची वेळ आली आहे. तरच महिला अत्याचार कमी होतील.
याप्रसंगी मनोज यलगुलवार, तिरुपती परकीपंडला, भीमाशंकर टेकाळे, रमेश जाधव, अनिल मस्के, विवेक कन्ना, अनिल जाधव, राजेंद्र शिरकुल, खाजाभाई शेख, दीनानाथ शेळके, सुनील व्हटकर, सुभाष वाघमारे, माऊली जाधव, ओंकार गायकवाड, दिनेश राठोड, नासीर शेख, अँड करिमुनिस्सा बागवान, मुमताज तांबोळी, चंदाताई काळे, विजयालक्ष्मी झाकणे, शकुंतला कट्टीमनी, भाग्यश्री जाधव, अनिता भालेराव, सानिया पठाण, मुमताज शेख, अभिषेक अच्युगटला आदी उपस्थित होते
सूत्रसंचालन शिवशंकर अंजनाळकर तर आभार संदीप वाडेकर यांनी केले.