सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुप्रसिद्ध एडवोकेट संग्राम देसाई यांची बार कौन्सिल अध्यक्षपदी नुकतीच एकमताने निवड….
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुप्रसिद्ध एडवोकेट संग्राम देसाई यांची बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याच्या अध्यक्षपदी नुकतीच एकमताने निवड झाली. 2019 मध्ये झालेल्या बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याच्या निवडणुकीत संग्राम देसाई यांनी विजय मिळवला होता पहिल्याच पदार्पणात दोन वेळा बार कौन्सिलचे उपाध्यक्षपदी निवडून येण्याचा बहुमान ही एडवोकेट देसाई यांना मिळाला होता सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दृष्टीने त्यांची निवड ही अभिमानाची गोष्ट आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातून बार कौन्सिलचे अध्यक्ष पद मिळवण्याचा पहिला बहुमान एडवोकेट संग्राम देसाई यांना मिळाला आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक वकिलांनी मुंबई येथे उच्च न्यायालयातील बार कौन्सिलच्या कार्यालयात चार तारखेला झालेल्या या कार्यक्रमात आपली उत्स्फूर्त उपस्थिती दर्शवली होती केवळ सिंधुदुर्गातीलच नव्हे तर रत्नागिरी कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर मुंबई रायगड ठाणे पालघर गोवा आधी ठिकाणाहून आलेल्या शेकडो वकिलांनी त्यांचे अभिनंदन केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खतनाम फौजदारी वकील एडवोकेट उमेश सावंत यांनी एडवोकेट संग्राम देसाई यांचे अभिनंदन केले