सोलापूर बातमीमहाराष्ट्रसोलापूर राजकीयसोलापूर सामाजिक

कामगार संघटना महासंघाचे सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर भव्य निदर्शने…

सोलापूर दि.18/12/2024 सोलापूर जिल्ह्यातील बांधकाम कामगारांच्या विविध मागण्याबाबत सोलापूर कामगार संघटना महासंघाचे निमंत्रक विष्णू कारमपुरी(महाराज) यांचा नेतृत्वाखाली व बालाजी चराटे, सोहेल शेख,अंगद जाधव,गणेश बोड्डू,वैशाली बनसोडे,यांच्या प्रमुख उपस्थितीत सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर भव्य निदर्शने करण्यात आले.
सोलापूर जिल्ह्यातील बांधकाम कामगारांच्या मोठ्या समस्या असून या समस्या सोडविण्याचा प्रयत्न शासन किंवा प्रशासन करीत नाही केवळ बांधकाम कामगारांच्या नावाने लूटमार,फसवणूक, भ्रष्टाचार, सुरू आहे याबाबत झोपीचे सोंग घेतलेल्या महाराष्ट्र शासनाला जाग आणण्यासाठी बांधकाम कामगार महासंघाने यापूर्वी कामगार मंत्री कामगार आयुक्त सहाय्यक कामगार आयुक्त जिल्हाधिकारी या सर्वांना निवेदने दिली परंतु यांच्याकडून कुठलीही कार्यवाही झालेली नाही म्हणून महासंघाने दिनांक 18 डिसेंबर 2024 बुधवार रोजी भव्य निदर्शने करण्याचा इशारा दिला त्यानुसार आज सकाळी 11 वाजता विष्णू कारमपुरी (महाराज) व महासंघाचे सर्व नेते गणांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली यावेळी बांधकाम कामगारांनी कामगार एकजुटीचा विजय असो,कामगार संघटना महासंघाचा विजय असो, बांधकाम कामगारांना बोनस मिळालेच पाहिजे,डब्ल्यू एफ सी कामकाज बंद झालाच पाहिजे,महायुती सरकारचा अधिकार असो, आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा,कोण म्हणतंय करणार नाही = केल्याशिवाय सोडणार नाही, अशा जोरदार घोषणा दिल्या त्यानंतर सहाय्यक कामगार आयुक्त यांना10 मागण्यांच्या निवेदन सादर करण्यात आले
सदर निदर्शनात विष्णू कारामपुरी(महाराज),बालाजी चराटे,अंगद जाधव,सोहेल शेख, गणेश बुड्डू,वैशाली बनसोडे, जोहेदा शेख,सोहेल जागीरदार, विठ्ठल कुराडकर,रेखा आडकी, गुरुनाथ कोळी,राधिका मीठा, सविता दासरी,अनिता सुंचु,ओम चराटे,रेणुका भिसे, रंजना भिसे वैशाली भोसले,आदित्य भोसले, भैया आवळे,गणेश राक्षे,अजिंक्य भोसले,समर्थ लंगोटे,राहुल कोडवाल,करण गारलेपल्ली, रोहन गेजगे, आदि प्रमुख व बांधकाम कामगार मला मोठ्या संख्येने सामील झाले होते.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel