सोलापूर निधन वार्ता
शामकांत काळे ह्यांचे दुःखद निधन

सोलापूर : कृषी महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक डॉ शामकांत पंढरीनाथ काळे (वय ८८) ह्यांचे काल रात्री दुःखद निधन झाले. मूळचे वैरागचे असणारे डॉ काळे सर शेतकी तज्ञ होते,सर्वांशी आपुलकीने वागणारा एक प्रेमळ दुवा हरपल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली. त्यांचे वडील कै.पंढरीनाथ काळे आणि सासरे कै. रामचंद्र मुस्तीकर हरिभाई शाळेचे मागील पिढीतील नामवंत शिक्षक होते.
आज सकाळी त्यांचे पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सूना,जावई, नातवंडे असा परिवार आहे!