न्यायालय निर्णयसोलापूर क्राईम

लैंगिक अत्याचार व अट्रॉसिटी प्रकरणी अटकेतील आरोपीस जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे जामीन मंजूर…

लैंगिक अत्याचार व ॲट्रॉसिटी प्रकरणी अटकेतील आरोपी प्रकाश शरद ढगे विरुद्ध कामती पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हे क्रमांक – २९६/२४ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ६४,३५१ (२) ,३५१(३) तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ चे कलम ३(१)(w)(i),३(१)(w)(ii),३(२)(va),३(१)(r),३(१)(s)
अंतर्गत दि- १३/०९/२०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सबब प्रकरणात फिर्यादी यांच्या घरातील लोक देवदर्शनाला गेले असताना रात्रीच्या वेळेस आरोपी हा त्यांच्या वस्तीवर जाऊन सदर फिर्यादी ही एकटी असल्याचा गैरफायदा घेऊन जोर जबरदस्तीचे प्रयत्न केले होते ,तसेच पिडीतेने सुटकेचा प्रयत्न करत असताना देखील सदर आरोपीने धमकावल्याने तसेच जीवाचे बरे वाईट करेन आणि मुलांना मारून टाकेन या भीतीपोटी पिडीता‌ घाबरलेली होती.आरोपीने दिलेल्या धमकीच्या भीतीमुळे त्यानंतर देखील पिडितेवर त्याने वारंवार अत्याचार केले होते. घडलेल्या घटनेनंतर देखील पिडीतेने समजावून सांगून सुद्धा आरोपीने पिडितेस त्रास देणे सुरूच ठेवले होते. तसेच फिर्यादीने सदर घडलेल्या प्रकार व मिळालेला मानसिक त्रास संबंधित कोणालाही सांगितले नव्हते परंतु आरोपीच्या वारंवार त्रासामुळे सदरची फिर्याद कामती पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल करण्यात आली होती. आरोपीला दिनांक १३/०९/२०२४ रोजी अटक करण्यात आली होती. आरोपीने आपला जामीन अर्ज मे.जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे दाखल केला होता. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. केंद्रे यांनी आरोपीचा जामीन अर्ज सशर्त मंजूर केला आहे. वरील प्रकरणात आरोपीतर्फे ॲड. कदीर औटी , ॲड. दत्तात्रेय कापुरे,ॲड. वैभव बोंगे यांनी काम पाहिले

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel