सोलापूर बातमीमहाराष्ट्रशैक्षणिकसोलापूर सामाजिक

बहुजन शिक्षक महासंघातर्फे सावित्री- जिजाऊ जयंती निमित्त महिलांचा सन्मान…

महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाच्यावतीने महासंघाचे प्रदेशाध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या सोलापूर महानगरपालिका हिरवळीवर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित संघटनेतील महिलांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पबुके देऊन सन्मान करण्यात आला.
यामध्ये प्रारंभी डॉ. श्रुतिका उडानशिव यांची वैद्यकीय सेवेत डॉक्टरपदी रुजू झाल्यानिमित्त तसेच स्वप्नजा कसबे, निर्मला मौळे, पृथ्वी शिंदे, फरीदा बेलीफ, महानंदा शिंदे आदी महिलांचा सत्कार करण्यात आला.
यानंतर जिल्हाध्यक्ष प्रा. युवराज भोसले व मराठवाडा विभाग प्रमुख प्राचार्य किशोर बनसोडे यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल आणि राज्य संघटक अशोक पाचकुडवे यांची मोहोळ तालुका पत्रकार संघटनेच्या सचिवपदी निवड झाल्यानिमित्त टाळ्या वाजवून अभिनंदन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्य सरचिटणीस प्राचार्य बोधिप्रकाश गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन रवी देवकर यांनी केले तर उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष मुख्याध्यापक नितीन गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानले.
अन्यायग्रस्त शिक्षक व कर्मचारी यांच्या विषयी चर्चा आणि निर्णय झाल्यानंतर महासंघाचे प्रदेशाध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर, प्राचार्य बोधिप्रकाश गायकवाड, कोषाध्यक्ष नीलकंठ शिंगे, ख्यातनाम छायाचित्रकार विठ्ठल मोरे यांच्यासह इतर पदाधिकारी व सभासदांनी आपले विचार व्यक्त केले.

या सत्कार सोहळ्यास दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष दत्तात्रय शिंदे, आगतराव बनसोडे, रामन्ना गायकवाड, इन्नुस बाळगी, अरुण गणपा, यशपाल आकाडे, नागेश सातपुते, प्रा. अभिजित भंडारे, महिबूब तांबोळी, शुभम इंगळे, एकोराम चौगुले, नागनाथ गायकवाड, सिद्धेश्वर भुरले आदींची उपस्थिती होती.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

508 Insufficient Resource

The website is temporarily unable to service your request as it exceeded resouce limit. Please try again later.