सोलापूर -पत्नीच्याच भांडणातून ४ जणांनी मिळून बेदम मारहाण !

सोलापूर (प्रतिनिधी) : पत्नीसोबत झालेल्या भांडणाचा राग मनात धरून पत्नीसह चौघांनी एका व्यक्तीला घरातच शिवीगाळ करून हाताने, लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची आणि लाकडी काठीने पाठीवर, हातावर, डोक्यावर वार करून जखमी केल्याची अत्यंत संतापजनक घटना मडके वस्तीत घडली आहे. घरातच सुरक्षित नाही, तर जायचं कुठे ? या घटनेमुळे संपूर्ण वारद नगर परिसरात खळबळ उडाली आहे.
फौजदार चावडी पोलीस ठाणे – गु.र.नं. ८३०/२०२६
भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल
नेमकं काय घडलं ?
दिनांक : ०८/११/२०२६
वेळ : रात्री ८.३० वा. चे सुमारास
ठिकाण : मडके वस्ती, वारद नगर, सोलापूर
फिर्यादी मल्लिकार्जुन खाजाप्पा शिंदे, रा. मडके वस्ती, वारद नगर, सोलापूर हे घरी असताना ही घटना घडली.
आरोपी कोण ?
१) ललिता मल्लिकार्जुन शिंदे – पत्नी
२) पुजा इंगळे
३) अजिंक्य इंगळे
४) यशपाल शिंदे
सर्व रा. सोलापूर
४ जणांनी मिळून मारहाण !
तक्रारीनुसार, फिर्यादी यांचा पत्नीसोबत झालेल्या भांडणाचा राग मनात धरून पत्नी व आरोपी क्र. २ ते ४ यांनी मिळून फिर्यादीस शिवीगाळ करून हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
एका विरोधात चार जण… ही मारहाण होती की हल्ला ?
लाकडी काठीने डोक्यावर वार !
एवढ्यावरच हे थांबले नाहीत. आरोपी क्र. ४ यशपाल शिंदे याने त्याचे हातातील लाकडी काठीने फिर्यादीचे पाठीवर, हातावर व डोक्यावर मारून दुखापत केली.
डोक्यावर काठीने वार… जर वार चुकला असता तर ?
पोलिसात गुन्हा दाखल
या घटनेनंतर फिर्यादी यांनी दि. १०/११/२०२६ रोजी रात्री १०.५२ वा. फौजदार चावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तपास पोहेको ४७४ खरात करीत आहेत.
