सोलापूर बातमीमहाराष्ट्रशैक्षणिक

संविधान दिनानिमित्त रविवारी संविधान गौरव परीक्षेचे आयोजन….

सोलापूर – २६ नोव्हेंबर भारतीय संविधान दिनानिमित्त सम्यक अकॅडमी आणि लोकराजा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान गौरव परीक्षेचे आयोजन केले असल्याची माहिती राज्यकर निरीक्षक बुद्धजय भालशंकर यांनी दिली आहे. परीक्षेचे हे सहावे वर्ष असून रविवार २९ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० ते १२ या वेळेत ही परीक्षा संपन्न होणार आहे.जैन गुरुकुल प्रशाला सोलापूर येथे ही परीक्षा संपन्न होणार आहे.
१२ वी उत्तीर्ण /पदवी / पदव्युत्तर पदवी / स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी ही परिक्षा देऊ शकतात. परीक्षा देण्यातही वयाचे कोणतेही बंधन नाही. यशस्वी विद्यार्थ्यांना एकूण रोख रु. १५,०००/- शिष्यवृत्ती, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सहभागाचे प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे. परीक्षेचे स्वरूप हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे असून नावनोंदणी ऑनलाईन पद्धतीने करायची आहे. परीक्षेची फी,नावनोंदणी आणि अधिक माहितीसाठी बुद्धजय भालशंकर मो. ९९६०३७२७३६, आशुतोष तोंडसे -७०३८८८३३३९,सुशीलचंद्र भालशंकर -७०२०८५२५५३ यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel