सब इन्स्पेक्टर मोहम्मद इम्तियाज शहीद….

बीएसएफ सब-इंस्पेक्टर मोहम्मद इम्तियाज़ यांची शौर्यगाथा: जम्मूच्या सीमारेषेवर प्राणांची आहुती
“वतन की सरहदें महफूज रहें, इसी खातिर कुछ लोग अपनी जान हथेली पर ठेवून लढतात…”
भारत-पाकिस्तान सीमारेषेवरील जम्मूच्या आर.एस. पुरा सेक्टरमध्ये नुकत्याच झालेल्या क्रॉस बॉर्डर फायरिंगमध्ये सीमा सुरक्षा दलाचे (BSF) शूरवीर सब-इंस्पेक्टर मोहम्मद इम्तियाज़ शहीद झाले. शौर्य आणि निष्ठेचं ज्वलंत उदाहरण ठरलेल्या इम्तियाज़ साहेबांनी आपल्या पोस्टचे नेतृत्व करताना प्राणांची आहुती दिली.
प्राणपणाने कर्तव्य बजावणारा योद्धा
ज्यावेळी सीमारेषेवर अचानक गोळीबार सुरु झाला, त्यावेळी इम्तियाज़ यांनी आपल्या सहकाऱ्यांना सुरक्षित ठेवत स्वतः मोर्चा सांभाळला. त्यांनी एका जबाबदार अधिकाऱ्याप्रमाणे शत्रूच्या दिशेने डटून मुकाबला केला. ही फायरिंग अचानक झाली नसून, पाकिस्तानकडून सतत शस्त्रसंधीचे उल्लंघन करत भारतीय चौक्यांवर हल्ले होतात. अशा प्रसंगी आपली सेवा बजावत असताना इम्तियाज़ यांनी वीरमरण पत्करले.
धैर्य, सेवा आणि बलिदानाची प्रेरणा
मोहम्मद इम्तियाज़ हे फक्त एक जवान नव्हते, तर ते एक प्रेरणास्त्रोत होते. त्यांच्या कार्यपद्धतीत शिस्त, जबाबदारी आणि राष्ट्रभक्ती ठासून भरलेली होती. सैनिकी सेवा ही त्यांच्यासाठी केवळ नोकरी नव्हती; ती एक इबादत होती. त्यांनी सिद्ध केलं की, भारताच्या सीमांच्या रक्षणासाठी आपले प्राणही अर्पण करायला ते सदैव सिद्ध होते.
एकता आणि बलिदानाचं प्रतीक
आज देशातील कोट्यवधी नागरिक इम्तियाज़ यांना श्रद्धांजली वाहत आहेत. त्यांच्या शहादतीने पुन्हा एकदा हे स्पष्ट केलं की, भारताच्या सरहदांवर लढणारे जवान कोणत्याही धर्म-पंथापेक्षा वतनप्रेमाला महत्त्व देतात. मोहम्मद इम्तियाज़ हे भारताच्या धर्मनिरपेक्षतेचं आणि सैनिकांचं आदर्श रूप ठरतात.
जनतेची भावना आणि श्रद्धांजली
जम्मू, काश्मीर आणि देशभरात विविध ठिकाणी नागरिकांनी कैंडल मार्च आणि श्रद्धांजली सभांद्वारे इम्तियाज़ यांना आदरांजली अर्पण केली. सोशल मीडियावर #ShaheedImtiyaz हा हॅशटॅग ट्रेंड होत असून हजारो लोक त्यांच्या वीरतेला सलाम करत आहेत.
अल्लाह त्यांच्या मग़फिरत फरमावो
एक सच्चा मुसलमान आणि सच्चा हिंदुस्तानी बनून मोहम्मद इम्तियाज़ यांनी आपल्या धर्माची खरी शिकवण जगासमोर मांडली — की अन्यायाविरुद्ध उभं राहणं आणि देशाच्या रक्षणासाठी प्राण देणं हेच इस्लामचं खऱ्या अर्थानं रूप आहे. आम्ही अल्लाह तआलाकडे दुआ करतो की, “अल्लाह इम्तियाज़ साहबच्या मग़फिरत फरमावो आणि त्यांना जन्नतुल फिरदौस नसीब करो.”
शेवटची सलामी:
“जो शहीद हुए हैं उनकी, ज़रा याद करो कुर्बानी…”
शहीद मोहम्मद इम्तियाज़ यांना ‘सोलापूर हल्लाबोल’ आणि संपूर्ण देशवासीयांकडून लाखो सलाम!