solapurpoliceक्राईममहाराष्ट्रसोलापूर निधन वार्तासोलापूर बातमी

सोलापूर – जुन्या भांडणाचा राग काढत ६ जणांकडून लोखंडी फायटर, लाकूड, काठीने हल्ला..!

सोलापूर, दि. ०१ सप्टेंबर –* किरकोळ भांडणाचा राग मनात धरून एका तरुणाला मध्यरात्री गाठून ६ जणांनी लोखंडी फायटर, लाकूड, काठी आणि दगडाने बेदम मारहाण केल्याची घटना हनुमान नगर येथे घडली आहे. याप्रकरणी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

*गुन्ह्याची माहिती –*

*गु.र.नं. व कलम :* ७०४/२०२६ – भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ११८(२), १९०, १९१(२), १९१(३), ३५२, ३५१(२) व मपोका १३५ प्रमाणे

*घटनेची वेळ व ठिकाण :* दि. २८/०८/२०२६ रोजी रात्री ००.४५ वा. हनुमान नगर, सोलापूर (सिंहगड चौक)

*गुन्हा दाखल :* दि. ०१/०९/२०२६ रोजी रात्री २२.०९ वा.

*फिर्यादी :* किशोर नागनाथ जाधव, वय – रा. ४९/५१ हनुमान नगर, भवानी पेठ, सोलापूर

*आरोपी :*

१) प्रभाकर अंबादास काशीद

२) स्वप्नील काशीद

३) संग्राम काशीद

४) विवेक कदम

५) सचिन बन्ने

६) पुनम काशीद (सर्व रा. भवानी पेठ, सोलापूर)

*नेमके काय घडले?*

फिर्यादी किशोर जाधव हे रात्री हॉटेल मधून जेवण पार्सल घेऊन आपल्या घरी जात होते. सिंहगड चौक येथे आले असता आरोपी क्र. १ प्रभाकर काशीद याने पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून इतर आरोपींना फोन करून घटनास्थळी बोलावून घेतले.

त्यानंतर सर्वांनी मिळून फिर्यादीस शिवीगाळ करत त्यांच्यावर लोखंडी फायटर, लाकूड, काठी आणि दगडाने चेहऱ्यावर व सर्वांगावर बेदम मारहाण करून जखमी केले.

इतक्यावरच न थांबता, “तुला जास्त मस्ती आली आहे, तुझ्या विरुद्ध पोलिसात खोटे गुन्हे दाखल करतो, तुला तडीपार करायला लावतो,” अशी धमकीही आरोपींनी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या प्रकरणी जोडभावी पेठ पोलिसांनी ६ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास करीत आहेत..

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel