सोलापूर क्राईम
सोलापूरातील माजी महापौरावर विनयभंगाचा गुन्हा दाखल…

सोलापूर महानगरपालिका चे माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार फौजदार चावडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झालेला आहे . माजी महापौर मनोहर सपाटे यांनी जबरदस्तीने हॉटेल शिवपार्वती लकी चौक येथील रूम न 205 , रूम न 307 मध्ये येऊन फिर्यादीस तू तर वेश्या आहेस आधी धंदा करत होतीस मग माझ्याबरोबर झोपायला तुला काय अडचण आहे असे म्हणून अश्लील बोलून फिर्यादीच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने तिच्याबरोबर अश्लील वर्तन करून मनास लज्जा वाटेल असे कृत्य केले व मोबाईल फोनवर वारंवार फोन करून संबंध ठेवण्याचा आग्रह केला म्हणून फिर्यादीची आरोपी विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दि.26.06.2025 रोजी दाखल केलेला आहे