सोलापुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची मिरवणुक रविवार दि. 19 एप्रिल 2026 रोजी निघणारच

महामानव, विश्वरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सव सोहळा मिरवणूक ही रविवार दि. 19 एप्रिल 2026 रोजी काढण्यात येणार आहे कारण खालील प्रमाणे तमाम महाराष्ट्रातील, कर्नाटक, आंध्रप्रदेश व मराठवाडा येथील भीमसैनिकांना आजपर्यंत सोलापुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मिरवणूक ही 14 एप्रिल नंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी साजरी केली जाते हे माहीत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मिरवणूक ही 14 एप्रिल नंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी जुन्या परंपरेनुसार साजरी केली जाते. त्या अनुषंगाने तमाम भीमसैनिक हे आपल्या कामकाजातील वेळात वेळ काढून रविवारी सोलापूरला येत असतात. तसेच विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या मिरवणुकीची नियोजन बैठक सोलापूर शहरातील सर्व भिमसैनिकांची वतीने शुक्रवार दि. 03/04/2026 रोजी सायंकाळी 5 : 30 वा. न्यु बुधवार पेठ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे होणार आहे.
तरी खालील सर्व मुद्दे हि सोलापूर शहरातील सर्व भिमसैनकांनी उपस्थित केले आहेत.
1) तसेच सोलापुरातील तमाम जाती-धर्मातील शहरवासीय आपले बांधव यांना रविवारी मिरवणूक असल्याकारणाने कोणत्याही प्रकारची गैरसोय होत नाही.
2) रविवारी मिरवणूक असल्याकारणाने वाहतूक व्यवस्थेवरील इतर वेळी असणारा ताण हा रविवारी कमी होतो त्यामुळे त्यांचीही गैरसोय होत नाही.
3) सर्व शाळा कॉलेजमधील परीक्षा चालू असल्याने आपल्या शालेय जीवनातील भीम बांधवांना रविवारी सुट्टी राहते त्यामुळे ते या जयंतीत सहभाग घेऊ शकतात.
4) रविवारी मिरवणूक असल्याकारणाने बाहेरगावी जे वास्तव्यास कामानिमित्त राहत आहेत त्यांना शनिवारी रात्री निघून रविवारी मिरवणुकीचा आनंद घेऊन पुन्हा परत जाऊन सोमवारी त्यांचे त्यांचे रेग्युलर कामकाज करता येते.
5) रविवारी आरोग्यदृष्ट्या सर्व हॉस्पिटल्समध्ये डॉक्टर्स सुट्टीवर असतात. त्यामुळे भीमजयंतीत सहभाग घेणाऱ्या सगळ्यांना वाहतुकीचा प्रॉब्लेम समस्या निर्माण होत नाही ते रविवारी हॉस्पिटलच्या कामाकरिता येत नाहीत.
6) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही कोण्या एका नेत्याच्या राजकारणाच्या पक्षाच्या किंवा एखाद्या घटकाच्या मनावर नसून ही जयंती मिरवणूक स्वाभिमानाची अभिमानाची रक्ताची आणि रक्तामधल्या भीमाची जयंती आहे त्यामुळे सर्व समाजाला जे सोयीस्कर होईल त्या पद्धतीनेच ही जयंती साजरी व्हावी असे आमचे मत आहे.
7) बाबासाहेबांची जयंती मिरवणूक ही काही ट्रायल करण्यासारखी गोष्ट नाही ही समाजाच्या अस्मितेची आणि समाजाच्या स्वाभिमानाची, अभिमानाची मिरवणूक आहे. त्यामुळे कोणीही ह्या मिरवणुकीशी कोणत्याही प्रकारे ट्रायल करण्याचा किंवा वेगळा पायंडा पाडण्याचा प्रयत्न करू नये असे वाटते.
तरी सोलापूर शहरातील विविध मंडळाचे अध्यक्ष व कार्यकर्ते यांची भावना लक्षात घेऊन सोलापुर शहरातील भिमसैनिकांच्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची मिरवणुक रविवार दि. 19 एप्रिल 2026 रोजी निघणार हि नम्र विनंती.
भीमसैनिक
आनंद चंदनशिवे बाळासाहेब वाघमारे दशरथ कसबे पिंटू डावरे रॉकी बंगाळे नागेश इंगळे सिद्धेश्वर पांडगळे अजित बनसोड सुहास सावंत अजित गादेकर सागर उबाळे आशितोष नाटकर लखन भंडारे बाळासाहेब बनसोडे विकी शेंडगे बबन शिंदे श्रीमंत जाधव बिना मेंबर चंद्रकांत सोनवणे इत्यादी मान्यवरच यावेळी उपस्थित होते



