माहेरहून 1 लाख रुपये घेऊन आली तरच आम्ही तुला नांदवू,”; गुन्हा दाखल..!

माहेरहून एक लाख आण, भाजीपाला व्यवसायासाठी पैशांची मागणी; गरोदर विवाहितेचा सासरच्या जाचाला कंटाळून गुन्हा दाखल
सोलापूर, दि. ०४ सप्टेंबर –* लग्नात मानपान केला नाही, दिवाळीला अंगठी घातली नाही आणि भाजीपाला होलसेल व्यापारासाठी भांडवल म्हणून माहेरहून एक लाख रुपये घेऊन ये, अशी मागणी करत गरोदर सुनेचा मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्ह्याची माहिती –*
• गु.र.नं. व कलम :* ६९३/२०२६ – भा.न्या.स. कलम ८५, ११५(२), ३५१(२), ३५२, ३(५) प्रमाणे
• घटनेची वेळ व ठिकाण :* दि. ०१/०९/२०२३ रोजी लग्नानंतर सुमारे ३ महिन्यांनी ते दि. २०/०५/२०२६ रोजी पर्यंत – सासरी, ओंकार कॉलनी, काळेवाडी, पुणे
• गुन्हा दाखल :* दि. ०४/०९/२०२६ रोजी दु. १४.२२ वा.
• फिर्यादी :* सोनाली कुमार जाधव, वय २५ वर्षे, रा. ओंकार कॉलनी, काळेवाडी, पुणे
• आरोपी :* १) कुमार – पती २) इंदुबाई – सासू ३) विशाल – दीर ४) सुवर्णा – जाऊ, सर्व रा. ओंकार कॉलनी, काळेवाडी, पुणे
*नेमके काय घडले?*
यातील फिर्यादी सोनाली ही सासरी नांदत असताना वरील नमूद आरोपींनी मिळून तिला – “तुझ्या माहेरच्यांनी आम्हाला लग्नात मानपान केला नाही. आमचे भाजीपाला होलसेल व्यापार करीता भांडवलाची आवश्यकता आहे तरी तू माहेरून पैसे व सोने घेऊन ये. तुझ्या घरच्यांनी दिवाळीला मानपान केला नाही, एक तोळ्याची अंगठी घातली नाही.”
“आम्हाला कार्यक्रमाला बोलवायचे असेल तर आमचा पाहुणचार चांगला करावा लागेल. आम्हाला येण्यासाठी गाडी पाठवण्यास सांग तुझ्या माहेरच्यांना. तू गरोदर आहेस तर काय झालं, घरातील कामे करावी लागतील. तू माहेरहून एक लाख रुपये घेऊन आली तरच आम्ही तुला नांदवू,” असे म्हणून मानसिक, शारीरिक त्रास देऊन मारहाण करून जाचहाट छळ केला.
याप्रकरणी फौजदार चावडी पोलिसांनी पतीसह चौघांविरुद्ध हुंडा छळाचा गुन्हा नोंदवला असून पुढील तपास , पोहे हे करीत आहे



