solapurpoliceक्राईममहाराष्ट्रसोलापूर क्राईमसोलापूर बातमीसोलापूर राजकीय

सोलापूर ST स्टँडवर गर्दीचा फायदा घेऊन सोन्याचे मंगळसूत्र चोरणारा चोरटा जेरबंद..!

सोलापूर, दि. ०७ सप्टेंबर – फौजदार चावडी पोलीस ठाणे हद्दीतील एस.टी. स्टँड परिसरात बसमध्ये चढणाऱ्या-उतरणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन दागिने व मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/वि.शा.) डॉ. अश्विनी पाटील, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) दिलीप पवार यांनी गुन्हे शाखेला सूचना दिल्या होत्या.

त्याअनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली शहर गुन्हे शाखेचे सपोनि दत्तात्रय काळे व त्यांचे तपास पथक आरोपींचा शोध घेत असताना दि. ०४/०९/२०२६ रोजी सपोनि दत्तात्रय काळे व त्यांचे पथकातील पो.ह. ४९६ हाजीमलंग शेख यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सोलापूर शहरातील दोन नंबर एस.टी. स्टँड समोरील मोकळे मैदान येथे एक इसम विना पावतीचे सोन्याचे गंठण विक्रीकरीता थांबला आहे.

माहितीची खात्री करून पथकाने सदर ठिकाणी जाऊन संशयितास शिताफीने ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने त्याचे नाव उमेर अफसर शेख, वय २७ वर्षे, व्यवसाय रिक्षाचालक, रा. ५९१/१ बी, नवीन विडी घरकुल, सोलापूर असे सांगितले.

त्याने सन २०२४ मध्ये सोलापूर एस.टी. स्टँड येथून एस.टी. मध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा गैरफायदा घेऊन एका महिलेच्या पर्समधील सोन्याचे मिनी गंठण चोरी केल्याचे कबूल केले. त्यानुसार फौजदार चावडी पोलीस ठाणे गु.र.नं. ७९२/२०२४ भा.दं.वि. कलम ३७९ अन्वये दाखल गुन्हा उघडकीस आला आहे.

पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून चोरी केलेले १३ ग्रॅम वजनाचे, ४०,०००/- रुपये किंमतीचे सोन्याचे मिनी गंठण हस्तगत केले आहे.

सदरची कामगिरी –

पोलीस आयुक्त एम. राज कुमार, पोलीस उप-आयुक्त डॉ. अश्विनी पाटील, सहायक पोलीस आयुक्त दिलीप पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दत्तात्रय काळे व त्यांचे पथकातील हाजीमलंग शेख, अनिल जाधव, रामेश्वर साखरे, कल्लप्पा देखणे व शंकर याळगी यांनी केली आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel