सोलापूर क्राईमसोलापूर राजकीय

Solapur : DK मोहसीन विरुद्ध फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल…

सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल...

Solapur : फसवणूक केल्याप्रकरणी DK मोहसीन विरुद्ध गुन्हा दाखल…१,७२,०००/- रूपयांची फसवणुक केल्याप्रकरणी मोहसीन सलीम नदाफ ऊर्फ डिके मोहसीन यांच्याविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात भादवि ४०६,४२०,५०४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

 

यात हकिकत अशी की, वरील वेळी व ठिकाणी, यातील फिर्यादी व यातील आरोपीत यांची गेले ८ ते १० वर्षापासून फिर्यादीचा मित्र आहे तो फिर्यादीस अधूनमधून भेटत होते. सन २०२३ मध्ये त्यांची डी. के. एंटरप्रायझेस प्रा. लि. कंपनीची शाखा मदिना हॉटेलच्या शेजारी शास्त्री नगर सोलापूर या कंपनीत फिर्यादीस पैसे गुंतविणेबाबत तयार केले त्यावेळी फिर्यादीने आरोपीतास २,३७,०००/- रू ऑनलाईन व्दारे रक्कम वेळोवेळी ट्रान्सफर केली आहे.

 

दि १२/०१/२०२४ रोजी डी. के. एंटरप्रायझेस प्रा.लि कंपनीची शाखा या ठिकाणी गेलेनंतर त्यामध्ये कोणत्याही प्रकारची साधनसामग्री नसल्याने फिर्यादीने त्यांना खोलात जावून विचारणा केली असता वरील आरोपीत मजकूर यांनी त्यावेळी उडवाउडवीची उत्तरे देवू लागले व कंपनीची कोणतेही माहिती न देता कागदपत्र दाखवली नाहीत त्यानंतर आरोपीतास वेळोवळी पैश्याची मागणी केली असता फिर्यादीस टाळाटाळ करत असे. त्यानंतर फिर्यादीने पोलीसात तक्रारी अर्ज केल्याचे समजल्यानंतर आरोपीत हा

 

फिर्यादीस तु पोलीसात दिलेली तक्रार मागे घे असे म्हणून दि ०७/०३/२०२४ रोजी फोन पेद व्दारे ५० हजार रूपये दिले व दि ०९/०४/२०२४ रोजी १५ हजार रूपये दिले आहेत व उर्वरित रक्कम ७९,०००/-रू इंडसलँड बँकेचे दि २०/०४/२०२४ व दि २०/०५/२०२४ रोजीचे असे मोहसीन नदाफ यांचे वडील सलीम नदाफ यांच्या नावाचे दोन चेक दिले व उर्वरित १४ हजार रूपये रोख स्वरूपात देतो असे सांगितले परंत त्यांनी दिलेले चेक देखील न वटता परत आले आहेत व १४ हजार रू देखील न देता आरोपीत मजकूर यांनी फिर्यादीची एकूण १,७२,०००/- रू अदयापर्यत न देवून फिर्यादीची फसवणुक केल्या प्रकरणी अब्दुलरहिमान अल्ताफहुसेन काझी, वय ३७ वर्षे, रा-५४/बी, मदनीनगर नडगिरी पेट्रोल पंपा शेजारी विजापूर रोड सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोहसीन सलीम नदाफ ऊर्फ डिके मोहसीन वय ३५ वर्षे, रा पिरसाब मेंबर गल्ली शास्त्री नगर सोलापूर यांच्याविरुद्ध भादवि ४०६,४२०,५०४,५०६ प्रमाणे सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अहिवळे हे करीत आहेत.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel