महाराष्ट्रराजकीयलोकसभा बातमी 2024सोलापूर बातमीसोलापूर राजकीय

सोलापूर : ‘प्रहार’ चे आवाहन ‘ नोटा ‘ ला करा मतदान ! पक्षाची अधिकृत भूमिका जाहीर

सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी दि.७ मे २०२४ रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत भाजपाकडून राम सातपुते तर काँग्रेसकडून प्रणिती शिंदे या उमेदवार आहेत. आज या निवडणुक प्रचाराचा शेवटचा दिवस असून प्रचार शिगेला पोहोचलेला आहे. या निवडणुकीत प्रचार करताना उमेदवारांनी ही निवडणुक हिंदू-मुस्लिम अशी करून शहरात जातीय तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न केल्याचे दिसून येते. निवडणुक ही विकासाच्या मुद्यावर व समाजातील विविध नागरी समस्यांबद्दल लढायची असते. परंतु तसे सोलापूरात होताना दिसून आलेले नाही. निवडणुकीला धार्मिक रंग देऊन निवडणुकीचा प्रचार झाल्याचे सगळ्यांनी बघितलेलेच आहे. त्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने सोलापूर लोकसभा निवडणुकीत ‘नोटा’ ला मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

सुशीलकुमार शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री असतांना पिण्याची पाईप लाईन आणण्याखेरिज त्यांनी कोणतेही विकासाचे काम सोलापूर शहरात केल्याचे दिसून येत नाही आणि प्रणिती शिंदे हे तर तीन टर्म म्हणजेच तीनदा आमदार होऊनही त्यांनी आपल्या मतदार संघात म्हणावा तसा विकास केलेला नाही. तर राम सातपुते यांनी हिंदू-मुस्लिम समाजात तणाव निर्माण होईल अशी वक्तव्ये करून हिंदू मते आपल्याच पदरात कशी पडतील याचाच विचार केलेला दिसून येतो. फक्त आणि फक्त जाती धर्मावर आधारित निवडणुक कशी होईल याचाच विचार भाजपाकडून झालेला आहे.

सोलापूर शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही आजही नागरिकांना सहा ते सात दिवसाआड पाणी पुरवठा होतो. पिण्याच्या पाण्याबाबत कुठलेही नियोजन महापालिकेकडू नसून नागरिकांना आजही गाळ मिश्रित पाणी पुरवठा होतो.

लक्ष्मी विष्णू मिल कामगारांच्या घरांचा प्रश्न सुटलेला नसून कामगारांना अद्यापही घरे मिळालेली नसल्याने हजारो कामगार आजही बेघरच आहेत. गेली कित्येक वर्षे कामगार हे लोकशाही पध्दतीने लढा देत असून त्याकडे शासन-प्रशासनाने डोळेझाक केलेली आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना वारंवार निवेदन देऊनही त्यांनी एक साधी बैठक सुध्दा कामगारांसोबत लावलेली नाही.

दिव्यांगांना महिन्याकाठी मिळणारी पेन्शन वेळेवर मिळत नाही, परिवहनची उपक्रमाची तर दुरावस्थाच झालेली आहे कामगारांच्या पगारीचा प्रश्न अद्यापही प्रलंबितच आहे. सोलापूर शहरात नागरी सोई सुविधांचा बोजवारा उडालेला असून याबाबत महापालिकेचे कर्मचारी अधिकारी मूग गिळून गप्प आहेत. शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे. सोलापूर शहराचा विकास होण्याऐवजी ते ‘भकास’ झाल्याचे दिसून येत आहे. शहरातील युवकांना नोकऱ्या नसल्याने त्यांचा कल मुंबई-पुणेकडे वाढलेला आहे. त्यामुळे सोलापूर शहरातील नागरी संख्या कमी होत आहे. युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी कुठलेही प्रयत्न झालेले नाही.

शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नसल्याने कित्येक शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केलेल्या आहेत. शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोगाच्या धर्तीवर एमएसपी देण्यात यावी. शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यास एक महिन्यात त्यांना मदत देण्यात यावी.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी न केल्याने दुसऱ्या वस्तूंचे दर वाढत चालले आहे आणि त्यामुळे महागाईही वाढत आहे. महागाई कमी करण्यासाठी कोणतेही ठोस पाऊले उचलली गेली नाहीत. त्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने सोलापूर लोकसभा मतदार संघातील नागरिकांना ‘नोटा’ ला मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत असून हजारो नागरिक हे ‘नोटा’ ला मतदान करणार असल्याचे प्रहार जनशक्ती पक्षाने आपली अधिकृत भूमिका जाहीर केलेली आहे …
या प्रसंगी शहर प्रमुख अजित कुलकर्णी, जिल्हा संपर्कप्रमुख जमीर शेख , शहर कार्यकारी प्रमुख खालिद मणियार ,जिल्हा उप प्रमुख महेश शिंगाडे, जिल्हा युवक अध्यक्ष मोहसिन तांबोळी , माजीद पतेल आदी उपस्थित.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login