राजकीयमहाराष्ट्र

दगड माराल तर तुमच्या सभा कशा होतात, ते आम्ही पाहू, -अंबादास दानवे

जळगावमधील पाचोरा येथे आज संध्याकाळी उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होत आहे. त्यापार्श्वभूमीवर जळगामध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आम्ही दगड मारून सभा, आंदोलने उधळून टाकणारी लोकं आहोत, असा इशारा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला आहे. त्यावर दगड माराल तर तुमच्या सभा कशा होतात, ते आम्ही पाहू, असा इशाराच ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी दिला आहे.

शिवसैनिकांसाठी फार कठीण नाही

आज जळगाव येथे माध्यमांशी संवाद साधताना अंबादास दानवे म्हणाले, मंत्री गुलाबराव पाटील यांनी आव्हान दिल्यामुळे शिवसैनिक अधिक त्वेषाने ही सभा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. शिवसैनिकांसाठी अशी आव्हाने परतावून लावणे फार कठीण नाही. तुम्ही दगड मारण्याची भाषा करत असाल तर आम्हालाही विचार करावा लागेल की तुमच्या सभा कशा होतील.

…तर तुमच्या सभा होणे कठीण

अंबादास दानवे म्हणाले की, शिवसेनेने आतापर्यंत कुणाच्याही सभा होऊ नये, यासाठी प्रयत्न केले नाही. आजची सभा राजकीय आहे. तुम्हाला उद्धव ठाकरेंचे विचार ऐकायचे असतील तर सभेत या. विचार ऐकवले जात नसतील तर कानात बोळे घाला. मात्र, दगड मारण्याची भाषा करत असाल तर लक्षात ठेवा ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी. पुढे तुमच्याही सभा होतील. शिवसैनिक संतापले तर तुमच्या सभा होणे कठीण होईल.

सभेच्या ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त

उद्धव ठाकरे यांचे जळगाव जिल्ह्यात स्वागत आहे. मात्र त्यांच्या सभेत संजय राऊत जर माझ्यावर बोलले तर मी थेट त्यांच्या सभेत घुसेल, असा इशारा शिवसेना नेते तथा मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊतांना दिला आहे. त्यांच्या या इशाऱ्यावर ठाकरे गटाने सभेत घुसून दाखवा आणि रोख 51 हजारांचे बक्षिस घेऊन जा, असे चॅलेंज दिले आहे. त्यामुळे आज सभेच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia