solapurpoliceक्राईममहाराष्ट्रसोलापूर क्राईमसोलापूर बातमी

सोलापूर- दवाखान्याजवळ लॉक केलेली गाडी लंपास! ३० हजारांची हिरो मेस्ट्रो चोरली – सोलापूरात चोरीचं सत्र सुरूच!

सोलापूर (प्रतिनिधी) : सोलापूर शहरात चोरट्यांचा हैदोस काही थांबायचं नाव घेत नाही. उत्तर कसबा परिसरात दवाखान्याजवळ लॉक करून पार्क केलेली ३० हजार रुपये किमतीची हिरो मेस्ट्रो मोटारसायकल अज्ञात चोरट्याने लबाडीने चोरून नेल्याची घटना घडली आहे. लॉक केलेली गाडीही सुरक्षित नसेल, तर सामान्य माणसाने गाडी ठेवायची कुठे ? या घटनेमुळे संपूर्ण उत्तर कसबा परिसरात खळबळ उडाली आहे..

फौजदार चावडी पोलीस ठाणे – गु.र.नं. ८२९/२०२६
भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल

नेमकं काय घडलं ?

दिनांक : १३/०९/२०२६
वेळ : सकाळी ११.०० वा. चे सुमारास
ठिकाण : उत्तर कसबा, सोलापूर

फिर्यादी गणेश बलराज नल्ला, रा. निर्मला डेव्हलपर्स, एमआयडीसी, सोलापूर यांनी आपली मोटारसायकल उत्तर कसबा येथे पार्क केली होती.

गेला माल काय ?

रु. ३०,०००/- पांढरे रंगाची हिरो मेस्ट्रो मोटार सायकल
क्र. एमएच १३ बीई एफ ४७४०

लॉक केलेली गाडीही चोरली !

तक्रारीनुसार, फिर्यादी यांनी वरील वर्णनाची व किंमतीची मोटारसायकल बोगावाडीकर दवाखान्याजवळ लॉक करून पार्क केली असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या संमतीवाचून, मुद्दाम लबाडीने चोरून नेली.

दिवसा ढवळ्या, दवाखान्याजवळ, लॉक केलेली गाडी चोरीला जाते, ही किती मोठी मुजोरी आहे ?

पोलिसात गुन्हा दाखल

या घटनेनंतर फिर्यादी यांनी दि. ११/११/२०२६ रोजी दुपारी १.४८ वा. फौजदार चावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तपास पोना/७३२ कामुर्ती -करीत आहेत..

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel