सोलापूरात – जगातील पहिली हायड्रोजन कार रस्त्यावर.…हायड्रोजन कारला भारतात उज्वल भविष्य…

ऑस्ट्रेलियातली पहिली हायड्रोजन कार आता रस्त्यावर दिसत आहे. या गाडीचं वैशिष्ट्य इतकं जबरदस्त आहे की ऐकूनच थक्क व्हावं. चार्जिंगसाठी फक्त पाच मिनिटं लागतात. त्यात स्टेशनपर्यंत जाऊन यायलाही वेळ धरला तरीही हा कालावधी खूपच कमी आहे. आणि एकदा टाकी भरली की गाडी जवळजवळ नऊशे किलोमीटर एकदम आरामात धावते.
पण खरी गोष्ट केवळ अंतराची नाही, तर तिच्या specification आहे. आपल्या दैनंदिन वापरातील पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या गाड्या धूर सोडतात आणि प्रदूषण वाढवतात. ही कार तसं करत नाही करत उलट चालतांना रस्त्यावरील हवा शुद्ध करते. म्हणजे प्रदूषण करत नाही तर प्रदूषण कमी करते.
हुंडईने लॉन्च केलेली नेक्सो नावाची ही गाडी या टेक्नॉलॉजी मध्ये सर्वांत पुढे आहे. फक्त 6.27kg हायड्रोजनवर चालणारी ही गाडी एका फेरीत जवळ जवळ 4.49 लाख लिटर प्रदूषित हवा स्वच्छ करते. हा आकडा ऐकायला थोडा attractive वाटतो, पण actual मध्ये हा आकडा एवढा आहे जेवढा ३३ लोक एका दिवसात श्वास घेतात त्या श्वासाइतकाच आहे. आणि कारच एझॉस्ट पाइपमधून बाहेर पडतं ते फक्त पाणी.
हाच प्रवास जर आपण एखाद्या डिझेल इंजिनाने केला असता, तर approx 126 kg कार्बन डाय ऑक्साईड CO2 हवेत गेलं असतं. हेच हायड्रोजन खरी कुवत आहे. त्यामुळे पुढील काळात या गाड्यांचा वापर खूप वेगाने वाढेल हे वेगळं सांगायची गरज नाही.
हायड्रोजन गाड्यांचं तंत्रज्ञान कसं काम करतं?
हायड्रोजन फ्युएल सेलमध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांचा संयोग होतो. त्या प्रक्रियेतून वीज तयार होते. आणि हीच वीज मोटरला चालवते. यातून ना धूर बाहेर पडतो, ना कार्बन, फक्त पाणी तयार होतं. त्यामुळे हे तंत्रज्ञान प्रदूषणविरहित आहे.
भारतासाठी सुवर्णसंधी का आहे?
भारत ग्रीन हायड्रोजन उत्पादनात जगातील अग्रगण्य देश ठरू शकतो. नैसर्गिक संसाधनं मुबलक आहेत. सरकारने राष्ट्रीय ग्रीन हायड्रोजन मिशन सुरू केलं आहे. जागतिक स्तरावर जेव्हा या गाड्यांची मागणी वाढेल, तेव्हा सर्वात स्वस्त व चांगल्या दर्जाचा हायड्रोजन भारतच पुरवेल. यातून देशाचं अर्थकारण केवळ मजबूतच होणार नाही, तर भारत नवे रोजगार आणि निर्यात बाजारपेठ मिळवेल.
इलेक्ट्रिक vs हायड्रोजन
इलेक्ट्रिक कार चार्ज होण्यासाठी अर्धा तास ते तासभर वेळ घेते, हायड्रोजन कारला फक्त पाच मिनिटं लागतात.
इलेक्ट्रिक कारच्या बॅटऱ्या जड असल्यामुळे गाडीचं वजन जास्त होतं, रेंज मर्यादित राहते. हायड्रोजन कार हलकी आणि जास्त अंतर पार करणारी ठरते.
इलेक्ट्रिक कार वीजेवर अवलंबून असते, तर हायड्रोजन कारसाठी स्वतंत्र स्टेशन उभारावी लागतात. हे जरी सुरुवातीला अवघड वाटलं तरी भविष्यात हेच टिकाऊ समाधान ठरेल.
भविष्यातील बदल
जपान, जर्मनी, दक्षिण कोरिया यांसारख्या देशांनी हायड्रोजन स्टेशनचं जाळं उभारायला सुरुवात केली आहे. भारतातही काही वर्षांत हे नेटवर्क तयार होईल. एकदा पायाभूत सुविधा उभी राहिली की पेट्रोल-डिझेलवर अवलंबून राहण्याची गरजच उरणार नाही.
सगळ्यात मोठं म्हणजे, या क्रांतीत भारताला सुवर्णसंधी आहे. कारण हायड्रोजन स्वस्तात आणि मोठ्या प्रमाणावर तयार करण्याची ताकद आपल्याकडेच आहे. त्यामुळे भविष्यातली गाडी केवळ इलेक्ट्रिकवर थांबणार नाही. हायड्रोजन आणि इलेक्ट्रिक यांचा संगम होणार आहे. आणि या खेळात भारतच जगाचा खरा गेमचेंजर ठरणार आहे.



