solapurpoliceक्राईममहाराष्ट्रसोलापूर क्राईमसोलापूर बातमी

सोलापूर – अरबाज हत्तुरे याच्यावर चाकू-लोखंडी हत्याराने जीवघेणा हल्ला गुन्हा दाखल !

सोलापूर – सोलापूरच्या मध्यवर्ती भागात असलेल्या होम मैदान परिसरात जुन्या भांडणाच्या रागातून एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्याची धक्कादायक घटना घडली आहे. भांडण मिटवण्यासाठी गेलेल्या तरुणाला तिघांच्या टोळक्याने शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी देत लोखंडी हत्यार आणि चाकूने खांद्यावर व गळ्याजवळ वार करून रक्तबंबाळ केले आहे. या घटनेने सदर बाजार परिसरात खळबळ उडाली आहे.

गुन्ह्याची माहिती –

पोलीस ठाणे – सदर बाजार पोलीस ठाणे, सोलापूर
गु.र.नं. – ८९८/२०२६ – कलम ११८(२), ११५(२), ३५१(२), ३५२, ३(५) भारतीय न्याय संहिता
घटनेची वेळ व ठिकाण – दि. १५/१०/२०२६ रोजी सकाळी १०.३० वा. होम मैदान, सोलापूर
गुन्हा दाखल वेळ – दि. १८/१०/२०२६ रोजी रात्री ००.५७ वा.
फिर्यादी – अरबाज महम्मद हुसेन हतुरे, वय १९ वर्षे, रा. हतुरे कॉम्प्लेक्स, बेगम पेठ, सोलापूर
आरोपी – १) सैफन शेख २) आदिलशा गुड्डापूरे ३) आहाद तांबोळी, सर्व रा. सोलापूर

नेमका काय आहे प्रकार? (हकीकत)

फिर्यादी अरबाज हतुरे यांचे आणि आरोपी सैफन शेख, आदिलशा, आहाद तांबोळी यांचे होम मैदान येथे पूर्वी भांडण झाले होते. ते भांडण मिटवण्यासाठी फिर्यादीचा भाऊ अबुझर बागवान हा पानगल हायस्कूल जवळ गेला असता, दबा धरून बसलेल्या या तिघांच्या टोळक्याने त्याला गाठले.

जुन्या रागातून या तिघांनी मिळून अबुझरला अर्वाच्य शिवीगाळ करून “तुला जिवंत सोडणार नाही, जीवे मारून टाकू” अशी थेट धमकी दिली.

धमकी देऊनच हे थांबले नाहीत, तर या मुजोर टोळक्याने लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण सुरू केली आणि सोबत आणलेल्या लोखंडी हत्याराने व धारदार चाकूने खांद्यावर व थेट गळ्याजवळ वार करून गंभीर जखमी केले. गळ्यावर वार असल्याने हा हल्ला जीव घेण्याच्याच उद्देशाने केल्याचे स्पष्ट होत आहे.

जखमी अवस्थेत तरुणाला सोडून हे तिन्ही आरोपी फरार झाले.

या जीवघेण्या हल्ल्यानंतर सदर बाजार पोलिसांनी तात्काळ तिन्ही मुजोर आरोपींविरुद्ध खुनाचा प्रयत्न व गंभीर दुखापतीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सपोनि पाटील हे करीत आहेत…

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel