नई जिंदगी येथे बचत गट कर्मचाऱ्यांचा दहशतवाद: मध्यरात्री घरात घुसून महिलांना शिवीगाळ व धमक्या!

नई जिंदगी येथील विजयालक्ष्मी नगरात. भारत फायनान्स कंपनीच्या बचत गटाच्या कर्मचाऱ्यांनी अक्षरशः दहशत पसरवली आहे. कर्जाचा हप्ता वेळेवर न भरल्याने, मध्यरात्री साडेअकराच्या सुमारास या कर्मचाऱ्यांनी. थेट गटधारक महिलांच्या घरात घुसखोरी करत. त्यांना शिवीगाळ केली आणि गंभीर परिणाम भोगावे लागतील अशा धमक्या दिल्या.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर महिलांना भारत फायनान्स कंपनीकडून घेतलेल्या कर्जाचा हप्ता गुरुवारी भरायचा होता. मात्र, आर्थिक अडचणींमुळे त्या हप्ता वेळेवर भरू शकल्या नाहीत. याच कारणामुळे, पैसे वसूल करण्याच्या नावाखाली सलीम शेख, शरद देवकते आणि संभाजी या बचत गट कर्मचाऱ्यांनी. मध्यरात्री महिलांच्या घरात प्रवेश केला आणि शिवीगाळ, धमक्या देण्यास सुरुवात केली.
या अनपेक्षित आणि दहशतीच्या प्रकारामुळे भयभीत झालेल्या महिलांनी. तात्काळ पोलीस नियंत्रण कक्ष 112 वर कॉल करून पोलिसांना मदतीसाठी बोलावले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने धाव घेतली.
या प्रकारानंतर. उशिरा रात्री एमआयडीसी पोलीस ठाण्यात. बचत गट कर्मचारी सलीम शेख, शरद देवकते व संभाजी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मध्यरात्री घरात घुसून महिलांना धमकावल्याच्या या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, फायनान्स कंपन्यांच्या वसुली पद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.



