महाराष्ट्र

महापुरानंतर नागरिकांच्या आरोग्य रक्षणासाठी वांगी गावात आरोग्य शिबिराचे आयोजन

सोलापूर : सीना नदीला आलेला महापूर आता हळूहळू ओसरत असला तरी त्याचे परिणाम मात्र अद्यापही नागरिकांच्या जीवनावर जाणवत आहेत. विशेषतः पुरग्रस्त गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता खालावल्याने, तसेच चिखल व अस्वच्छतेमुळे नागरिकांना आरोग्यविषयक समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहेत. या पार्श्वभूमीवर सोलापूर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नजीब शेख यांनी सामाजिक बांधिलकी जपत दक्षिण सोलापूर तालुक्यातील वांगी गावात आरोग्य शिबिराचे आयोजन केले.

या आरोग्य शिबिराचे उद्घाटन आरोग्य सेवक बाबा मिस्त्री यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, प्रहार संघटनेचे नेते जमीर शेख, अजित बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते.

शिबिरात डॉ. हाफिज जुनैदी आणि डॉ. जुवेरिया जुनैदी यांच्या मार्गदर्शनाखालील अनुभवी मेडिकल टीमने गावातील नागरिकांची सविस्तर आरोग्य तपासणी केली. या शिबिरात रक्तदाब, ताप, त्वचारोग, पोटाचे आजार, पाणीजन्य आजार यासह विविध तपासण्या करण्यात आल्या. यावेळी तब्बल १५० हून अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली.

नजीब शेख यांनी या वेळी सांगितले की, “पूरस्थितीनंतर गावांमध्ये आरोग्य सुरक्षेची गरज अधिक आहे. नागरिकांनी आरोग्य तपासणी करून योग्य उपचार घ्यावेत, हीच या शिबिरामागची भूमिका आहे.”

दरम्यान, उद्या शनिवार रोजी देखील हे आरोग्य शिबिर सुरू राहणार असून सर्व गावकऱ्यांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे महापुरानंतर त्रस्त झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाल्याचे समाधान ग्रामस्थांनी व्यक्त केले.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login