सोलापुरात हिट अँड रनचा थरार; कारच्या धडकेत पतीचा मृत्यू, पत्नी-मुलगी जखमी..!

सोलापूर, दि. ०१ सप्टेंबर (माहिती कक्ष) – केगाव नवीन ब्रिज जवळ भरधाव चारचाकीने दुचाकीला डाव्या बाजूने जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला असून, पत्नी व मुलगी किरकोळ जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अपघातानंतर आरोपी चालक गाडीसह पसार झाला आहे.
या प्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात अज्ञात कार चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
गुन्ह्याची माहिती –
– गु.र.नं. : ६८७/२०२६ – भा.न्या.सं. कलम २८१, १०६(१), १२५(अ) व मोवाकाक १८४/१७७, १३४(अ)(ब) प्रमाणे
– अपघात वेळ : दि. २२/०८/२०२६ रोजी दुपारी ३:३० वा. केगाव नविन ब्रिज जवळ, सोलापूर
– गुन्हा दाखल : दि. ३१/०८/२०२६ रोजी रात्री १०:५१ वा.
– फिर्यादी : लक्ष्मी सोनप्पा शिरगेरे (रा. लांबोटी, ता. मोहोळ, जि. सोलापूर)
– आरोपी : चारचाकी वाहन क्र. MH १२ BE ६७६४ चा अज्ञात चालक
हकीकत अशी –
फिर्यादी लक्ष्मी शिरगेरे, त्यांचे पती आणि मुलगी असे तिघे दुचाकी क्र. MH १३ FB ८७८९ वरून अक्कलकोट कडे जात असताना केगाव नवीन ब्रिज जवळ आले असता, समोरून आलेल्या MH १२ BE ६७६४ या चारचाकीच्या अज्ञात चालकाने आपल्या ताब्यातील वाहन हयगयीने व भरधाव वेगाने चालवून दुचाकीस डाव्या बाजूने जोरदार धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की, फिर्यादीच्या पतीचे दुचाकीवरील नियंत्रण सुटून गाडी रस्त्याच्या मधोमध असलेल्या डिव्हायडरवर आदळून तिघेही खाली पडले. या अपघातात फिर्यादी व त्यांची मुलगी किरकोळ जखमी झाल्या, तर पतीचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची खबर न देता आणि जखमींना मदत न करता आरोपी चालक गाडीसह पळून गेला.
फौजदार चावडी पोलिसांनी हिट अँड रनचा गुन्हा दाखल



