सोलापूर बातमीमहाराष्ट्रसोलापूर सामाजिक

श्रमिक पत्रकार संघ, डॉ. वैशंपायन स्मृती वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने

पत्रकारांसह कुटुंबीयांसाठी मोफत नेत्ररोग तपासणी शस्त्रक्रिया शिबीर..

सोलापूर श्रमिक पत्रकार संघ, छत्रपती शिवाजी महाराज शासकीय सर्वोपचार रुग्णालय, डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकारांसह त्यांचे कुटुंबीय आणि संस्थेतील कर्मचाऱ्यांसाठी मोफत शिबिर आयोजित करण्यात आले होते.
श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात हे शिबिर पार पडले. यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाच्या ही प्रा. डॉ. स्नेहलता येळमकर, डॉ. दौला ठेंगील, डॉ. श्रीकांत जाधव, डॉ. अर्चना यादव, डॉ. आकांक्षा पालीवाल, डॉ. प्रतीक्षा तानगावडे, डॉ. वैभवी कांबळे, डॉ. साक्षी बोगा , डॉ. अश्विनी आवटे, डॉ. विश्वजीत मठपती आदींनी तपासणी करून औषधोपचार केले. यावेळी श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, सरचिटणीस सागर सुरवसे, खजिनदार किरण बनसोडे, कृष्णकांत चव्हाण आदींसह पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी प्रा. डॉ. स्नेहलता येळमकर यांनी डोळ्यांची काळजी कशी घ्यावी आणि उपचार यासंदर्भात मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, प्रत्येकाने नियमित नेत्र तपासणी करून घेणे आवश्यक आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढे उपचार घ्यावेत, असे आवाहन केले.
यावेळी पत्रकार, पत्रकारेत्तर कर्मचारी आणि कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन खजिनदार किरण बनसोडे यांनी केले.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login