महाराष्ट्र

साप चावल्यास चुकूनही करू नका या 6 गोष्टी, आरोग्य मंत्रालयाने दिल्या सूचना

मुंबई : साप आणि सर्पदंश या फारसं बोललं जात नाही. पण सर्पदंश झाल्यावर काय करावं, प्रथमोपचार काय आहेत आणि रुग्णाचा जीव कसा वाचवावा. या गोष्टी जाणून घेणं सर्वांसाठीच श्रेयस्कर आहे. साप चावल्यावर काय करावे आणि काय करू नये या बेसिक गोष्टी तरी सर्वांना माहित असाव्या.

कारण कधीही अचानक अशी परिस्थिती निर्माण झाली आणि डॉक्टर लवकर उपलब्ध नसले तरी रुग्णाचा जीव वाचावा.

भारताचे वन्यजीव जगभर प्रसिद्ध आहेत. विविध वन्य प्राण्यांबरोबरच विविध जातींचे सापही येथे आहेत. भारतातील दुर्गम भागात, वैद्यकीय सुविधांअभावी अनेकदा साप चावल्यानंतर लोकांचा मृत्यू होतो. यामुळे भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाअंतर्गत आयुष विभागाने एक मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. या मार्गदर्शक तत्त्वांतर्गत, सर्पदंश झाल्यास लोकांनी काय करावे आणि काय करू नये हे सांगितले आहे. चा पाहुयात त्या सूचना काय आहेत.

साप चावला तर काय करावे?
– साप चावलेल्या व्यक्तीला धीर द्या आणि त्याला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा.
– हळू हळू सापापासून दूर जा.
– जखमी भाग हलवू नका आणि तो स्थिर ठेवा.
– सर्पदंशाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे दागिने, घड्याळ, अंगठी किंवा घट्ट कपडे असल्यास ते काढून टाका.
– रुग्णाला ताबडतोब स्ट्रेचरवर डाव्या बाजूला झोपायला लावा. उजवा पाय वाकलेला असावा आणि हाताने चेहऱ्याला आधार द्यावा.

साप चावल्यास काय करू नये?
– साप चावलेल्या व्यक्तीला घाबरू देऊ नका.
– सापावर हल्ला करण्याची किंवा मारण्याची चूक करू नका. तुम्ही असे केल्यास, साप बचावासाठी चावू शकतो.
– साप चावल्यामुळे झालेली जखम कापू नका. या जखमेवर विषविरोधी इंजेक्शन किंवा औषध लावू नका.
– जखमेवर बांधून रक्ताभिसरण थांबवण्याचा प्रयत्न करू नका.
– रुग्णाला त्याच्या पाठीवर झोपू देऊ नका. यामुळे वायुमार्गात अडथळा निर्माण होऊ शकतो.
– पारंपारिक उपचारांच्या भरवश्यावर राहू नका.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login