सोलापूर बातमीमहाराष्ट्रसोलापूर सामाजिक

मौलाली चौक येथे वाहतूक संघटना संयुक्त महासंघ व जनशक्ती न्यूज चॅनलच्या कार्यालयाचा उद्घाटन संपन्न…

सोलापुरातील मौलाली चौक येथे वाहतूक संघटना संयुक्त महासंघ आणि जनशक्ती न्यूज चॅनलच्या नूतन कार्यालयाचा उद्घाटन समारंभ काल मंगळवार दिनांक 25 फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. माजी आमदार तथा कामगार नेते कॉ.नरसय्या आडम मास्तर यांच्या शुभहस्ते फित कापून कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.याप्रसंगी सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक बाळासाहेब सलगर, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नूतन सचिव युसुफ मेजर, साद मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे चेअरमन फयाज सय्यद, वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद आणि जनशक्ती न्यूज चॅनलचे संपादक इलियास सिद्दिकी यांची प्रमुख उपस्थिती होती.रियाज सय्यद यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत आणि प्रास्ताविक केले. रियाज सय्यद यांनी आजपर्यंत रिक्षाचालकांसाठी उल्लेखनीय कार्य केले असून त्यांना आमचा सदैव पाठिंबा राहील अशी ग्वाही यावेळी आडम मास्तरांनी दिली. तर रियाज सय्यद यांनी वाहनांना एचएसआरपी अर्थात हाई सिक्युरीटी रजिस्ट्रेशन प्लेट लावण्यासाठी आकारण्यात आलेले सहाशे रुपये शुल्क रिक्षा चालकांसाठी न परवडणारे असून दिल्लीच्या धर्तीवर 85 रुपये करावे, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा आरटीओ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दिला. याप्रसंगी उपस्थित असलेले कॉम्रेड युसुफ मेजर आणि इलियास सिद्दिकी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. दरम्यान एका रिक्षा चालकाच्या मुलाने एमपीएससी परीक्षेत देदीप्यमान यश संपादित केल्याबद्दल त्या रिक्षा चालकाचा यथोचित सत्कार करण्यात आला. याप्रसंगी महासंघाचे शहर अध्यक्ष अल्लाहबक्ष शेख, इरफान कल्याणी,लाडजी नादाफ, इमरान शेख, तुफान शेख, शंकर राउत, रमेश बनसोडे, नागेश वाघमारे, अशोक बनसोडे, गौस शेख, आसिफ शेख, मोहसीन बागवान,इस्माईल गुंता सैफन कुरेशी, सादिक शेख
रीक्षा चालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रदीप शिंगे यांनी केले.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login