महाराष्ट्र

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघांना अंतरिम जामीन मंजूर

यात हकीकत अशी, मोहोळ पोलीस स्टेशन अंतर्गत भा.द.वी ३०६, ३४ व ४५ महाराष्ट्र मनी लेंडिंग ऍक्ट प्रमाणे आरोपी रामचंद्र धोंडीबा चंदनशिवे व त्यांची पत्नी यांच्याविरुद्ध दिनांक 20/9/2023 रोजी गुन्हा र.नं. 690/2023 गुन्हा दाखल करण्यात आला होता व त्यामध्ये पेट्रोल पंप च्या मॅनेजर यास पैशाच्या कारणावरून पैसे परत देण्याचा तगादा लावून त्याच्याकडून जबरदस्तीने शेतजमीन खरेदी केल्याच्या आरोपावरून मयत फिर्यादीचे पती नितीन आतकरे यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची फिर्याद दाखल करण्यात आलेली होती. या कामी रामचंद्र व रोहिणी चंदनशिवे यांनी सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज 21/9/ 2023 रोजी दाखल केला होता व त्यामध्ये आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून मे.जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपींना अंतरीम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. वरील प्रकरणांमध्ये आरोपीं तर्फे ॲड कदीर औटी ,ॲड.यासीन अजीज शेख व ॲड कापुरे यांनी काम पाहिले.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel