सोलापूर बातमी

सोलापूर – गोवा विमान तिकिट बुकिंगला सुरुवात — सोलापूर विकास मंचाच्या संघर्षाला यश…

सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी! Fly 91 या विमान सेवेद्वारे सोलापूर ते गोवा आणि गोवा ते सोलापूर या मार्गावरील तिकिट बुकिंगला अधिकृतपणे सुरुवात झाली आहे. या ऐतिहासिक क्षणामागे सोलापूर विकास मंच व त्यांच्या पदाधिकाऱ्यांचा अनेक वर्षांचा सातत्यपूर्ण संघर्ष, पाठपुरावा आणि अथक प्रयत्न कारणीभूत ठरले आहेत. सोलापूरसारख्या शहरातून गोवा या महत्त्वाच्या पर्यटन व औद्योगिक शहराशी थेट हवाई संपर्क होणे ही एक ऐतिहासिक आणि विकासात्मक घटना आहे.

सोलापूर विकास मंचने केंद्र सरकार, नागरी उड्डाण मंत्रालय व DGCA यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला आणि अखेर सोलापूरकरांच्या स्वप्नाला वास्तवात आणले. सर्व सोलापूरकरांना आवाहन करण्यात येत आहे की, तात्काळ आपल्या तिकिटांची नोंदणी करून या ऐतिहासिक उड्डाणाचा लाभ घ्यावा!

ही केवळ एक सेवा नाही, तर सोलापूरच्या विकासाच्या दिशेने टाकलेले एक भक्कम पाऊल आहे. बुकिंगसाठी Fly 91 च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या आणि आपल्या प्रवासाची तयारी करा!

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel