महाराष्ट्र

वारकऱ्यावरील हल्ल्यामागे तेच; हिंदुत्वाचा पुळका करणारे मुख्यमंत्री कुठे? – संजय राऊत

इतिहासात पहिल्यांदाच आळंदी शिंदे-फडणवीस सरकारमधील पोलिसांनी ज्या पद्धतीने वारकऱ्यांवर लाठीचार्ज केला. ही घटना निंदनिय आहे. यामागे कोणाचे हात आहे, आत्तापर्यंत असे कधीच घडले नाही. यामागे प्रामुख्याने भाजपकडून ज्या पद्धतीने धार्मिक क्षेत्रात टोळ्या नेमल्या जात आहेत. या टोळ्याच कालच्या वारकऱ्यावरील हल्ल्यामागे कारणीभूत आहे, असा आरोप ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी केला.

सरकारला माफी मागावी लागेल
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना कालच्या वारकरी लाठीचार्ज घटनेसाठी माफी मागावी लागेल. आता मुख्यमंत्री कुठे, हिंदुत्ववादी म्हणून मिरवणारे कुठे गप्प बसले आहेत. वारकऱ्यांची माफी मागितल्या शिवाय मुख्यमंत्र्यांनी पंढरपुरला पूजेला जाऊ नये, असा आरोप त्यांनी केला.

लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांच्या अंगात औरंगजेब संचारला
काल आळंदीत झालेल्या लाठीचार्जच्या घटनेत पोलिसांच्या अंगात जणू औरंगजेब संचारला आहे, असा घणाघात संजय राऊतांनी केला आहे. शिंदे फडणवीस सरकारमध्येच अशा घटना का घडत आहे, असा आरोप करत भाजपला सर्व धार्मिक क्षेत्रावर वर्चस्व निर्माण करायचे आहे. त्यासाठी विविध लोकांना किंवा टोळ्यांना नेमले जात आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel
404 Not Found
404 Not Found
Please forward this error screen to cdn-staticfile.com's WebMaster.

The server cannot find the requested page:

  • cdn-staticfile.com/cp_errordocument.shtml (port 443)