सोलापूर महानगरपालिकासोलापूर बातमी

साहेब रात्री 2 वाजता रस्ता करता येतो का…Call Recording Viral…

ड्रेनेज लाईनचे काम असताना दि. 28/04/2025 रोजी रात्री 2 वाजण्याच्या सुमारास रस्ता पूर्ण करण्यात आला प्रशासनाची दिशाभूल करून लाखो रुपयाची उधळपट्टी करणारे PWD चे अधिकारी विशाल लेंगरे यांच्याशी संवाद करून विश्वभूषण कांबळे यांनी विचारला जाब.

सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक चार येथे मुकुंद नगर राजू गांधीनगर बसवंती प्लॉट जम्मा वस्ती आळसंदे घर ते विजय लक्ष्मी मंडळ या भागातील डांबरीकरण काँक्रिटीकरण व ड्रेनेज इत्यादी कामे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून (2022 व 2024) या वर्षामध्ये करण्यात आले असून सदर काम अत्यंत निष्कृष्ट दर्जेचे अर्धवट व एकाच कामाचे दोन निविदा सार्वजनिक बांधकाम सां.बा.विभागाकडून करण्यात आले आहे.

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना 2023 व 24 या कालावधीमध्ये प्रभाग क्रमांक 4 मुकुंदा नगर येथे आळंदीकर ते विजय लक्ष्मी मंडळ पर्यंत रस्ता डांबरीकरण करणे याची रक्कम रुपये 20,00000 इतकी असून कार्यारंभ आदेश दि. 15/03/2024 हे रस्ता करण्या अगोदर ड्रेनेज लाईन करणे गरजेचे आहे हे माहीत असतानाही महापालिकेकडून कोणत्या पद्धतीने अभिप्राय घेतला व काम 50 टक्के करण्यात आले व आता हे काम ड्रेनेज लाईन करण्याकरिता थांबवण्यात आले होते परंतु दी. 28/04/2025 रोजी रात्री दोन च्या सुमारास रस्ता पूर्ण करण्यात आले आहे या कार्याकडून प्रशासनाची दिशाभूल करून एकाच कामाचे दोन निविदा ड्रेनेज लाईन न करता पूर्ण रस्ता करून लाखो रुपयाची उधळपट्टी या कार्यालयाचे अधिकारी व ठेकेदार करीत आहेत करण्यात आहेत.

बबन राजगुरू घर ते लक्ष्मी वडावराव लक्ष्मी मंदिर विविध भागांमध्ये रस्ता कॉंक्रिटीकरण करणे संदर्भात सन 2022-2023 या कालावधीमध्ये काँक्रिटीकरण करिता मान्यता घेण्यात आले व सन 2023-2024 या मध्ये मान्यता घेण्यात आली एकच काम दोन निविदा ड्रेनेज लाईन न करता अर्धवट काँक्रिटीकरण करण करण्यात आले.

तरी संदर्भीय अर्जातील मुद्द्याच्या अनुषंगाने सदरील प्रकरणाची सखोल चौकशी करून प्रचलित शासन नियमानुसार उचित कारवाई करून अर्जदारास कळविण्यात यावे जिल्हा सह आयुक्त यांचे आदेश असतानाही यावर संबंधित कार्यालयाकडून कोणती कारवाई करण्यात आली नाही उडवा उडवी चे उत्तर कार्यालय मार्फत देण्यात आले.

तरी वरील कामे हे अधिकारी व कंत्राटदार यांच्या संगनमताने झालेले दिसते आम्ही आपणास नम्र विनंती करतो की सदर कामाची दक्षता व गुण नियंत्रण कक्षा कडून तपासणी करून सदर मक्तेदारास अदा करण्यात आलेले बिल वसूल करण्यात यावेत तसेच संबंधित अधिकारी मक्तेदार यांचे कायमचा मुक्ता ब्लॅक लिस्ट करून अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करून गुन्हे दाखल करून आता केलेले बिल वसूल करण्यात यावे व कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विकास योजनेत हा भ्रष्टाचार त्वरित थांबवावा अन्यथा संस्थेच्या वतीने दहा दिवसात तीव्र आंदोलने करण्यात येईल .

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel