सोलापुरातील ‘या’ मुस्लिम रिक्षा चालकाने हिंदू बहिणी चे मन जिंकले … मौल्यवान दागिने केले परत..

सोलापुरातील मुस्लिम रिक्षाचालक हरीश सय्यद यांनी दाखवली प्रामाणिकपणाची आणि भाईचाऱ्याची जिवंत शिकवण; विसरलेली मौल्यवान बॅग हिंदू प्रवाशाला परत
सोलापुरात एक हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी घटना घडली आहे. शहरातील हरीश सय्यद अब्दुल रसूल जागीरदार या प्रामाणिक मुस्लिम रिक्षाचालकाने आपले कर्तव्य पार पाडत मानवी मूल्यांची जपणूक केली आहे.
घटना अशी की, कोणतं चौकातून प्रवास करणाऱ्या अंजली अजय देशमुख या हिंदू प्रवाशिनी रिक्षातून उतरतानाच आपली बॅग विसरली होती. त्या बॅगेमध्ये सोने, रोख रक्कम, तसेच अन्नसामग्री व इतर मौल्यवान वस्तू होत्या. अचानक बॅग न सापडल्याने अंजली देशमुख यांच्यावर चिंता आणि काळजीचे ढग दाटले होते.
मात्र, या बॅगेचा शोध लागल्यानंतर रिक्षाचालक हरीश सय्यद यांनी सोलापुरातील लोक प्रहार न्यूज चैनल चे संपादक व ज्येष्ठ पत्रकार श्री जमीर शेख यांना संपर्क केला असता तेव्हा त्या रिक्षा चालकांनी श्री जमीर शेख यांच्या सल्ल्याने व त्यांच्या सोबत वेळ न लावता लगेच जेलरोड पोलीस स्टेशन ला जाऊन त्यांनी पोलिसांच्या उपस्थितीत बॅग सुरक्षितपणे अंजली देशमुख यांच्याकडे परत केली.
हरीश सय्यद यांच्या या प्रामाणिक वर्तनामुळे केवळ अंजली देशमुख यांना दिलासा मिळाला नाही, तर संपूर्ण समाजात एक सकारात्मक संदेश पसरला आहे. धर्मापेक्षा मानवता मोठी असल्याचे यामुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
या घटनेचे सर्वत्र कौतुक होत असून हरीश सय्यद यांना समाजातून प्रामाणिक व विश्वासार्ह व्यक्ती म्हणून गौरवण्यात येत आहे. अशा घटना समाजातील ऐक्य, आपुलकी आणि परस्पर विश्वास अधिक दृढ करण्यास मदत करतात…
या बातमीचा आढावा घेतलेला आहे आमची प्रतिनिधी उजेब इनामदार यांनी…



