राजकीयसोलापूर राजकीय

सोलापुरातील इच्छुक नगरसेवक पावसाच्या पाण्यात भीजून हैराण….

महाराष्ट्र शासनाने येत्या काही दिवसांमध्येच महानगरपालिकेच्या निवडणुका होणार असल्याचे जाहीर केले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त यांनी विशेष पत्रकार परिषद घेऊन दीपावली नंतर निवडणुका होण्याच्या संकेत दिले पण निवडणुका कोणत्या महिन्यात होणार हे चित्र अद्याप स्पष्ट नसले तरी भावी नगरसेवक मात्र गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत….त्यात अनेक दिवसांपासून सामान्य लोकांच्या अळी अडचणीत कामाला येण्याचे ढोंग करणारे फक्त निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मी कसा लोकांसाठी सेवा करू शकतो असे आविर्भाव दाखवणारे सुद्धा नगरसेवक म्हणून महापालिकेत जाण्यासाठी इच्छुक आहेत पण निवडणूक येत नसल्याने या भावी नगरसेवकांचे किसे हळूहळू रिकामे होत चालले आहे…. काहीजण तर कर्ज करून निवडणूक लढण्यासाठी तयार आहेत तर काही लोक निवडणूक लवकरच होईल या भ्रमात भरमसाठ पैसा खर्च करून देशोधडीला लागले आहेत… अशातच मिळेल त्या कार्यक्रमात चमकोगिरी करून आपणच या भागाचे तारणहार होणार अशा प्रकारचा लोकांसमोर आव आणत आहेत पण प्रत्यक्षात मात्र काही जण ठळकपणे उठून दिसत आहेत तर काही या चमकुगिरी मध्ये सुद्धा उठून दिसत नाही हे सुद्धा नक्की आहे…. सोलापुरात गेल्या अनेक दिवसांपासून जोरदार पाऊस आहे आणि या पावसाने तर अख्या सोलापूरकरांना अक्षरशः हैराण करून सोडले आहे. अशातच अनेक सामान्य नागरिकांच्या घरात पाणी घुसत असल्याने हे भावी नगरसेवक मात्र आपल्या पेंटीचे पैंचे वर करून ज्या ज्या घरात पाणी घुसत आहे त्या घरात भेटी देऊन आजूबाजूला दोन-चार चमचे ठेवून पद्धतशीरपणे व्हिडिओ काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करत आहे…. लोकांच्या अडचणी हे मोठ्या असल्या तरी त्यात प्रामाणिकपणे काम करणारे काही भावी नगरसेवक आहेत बर का…. असे नाही की सर्वजण चमकोगिरी करणारे आहेत काही लोक या ठिकाणच्या
अनेक अडचणी सोडवण्यासाठी सुद्धा मदत करत आहेत…. जसा इतर कार्यक्रमामधून आपण कसे उठून दिसावे यासाठी प्रयत्न करणारे भावी नगरसेवक मात्र पावसाच्या पाणी घुसल्यानंतर सामान्य लोकांच्या घरात जाऊन सुद्धा अशाच पद्धतीचे व्हिडिओ काढून ते व्हायरल करत आहे हे मात्र या ठिकाणी नमूद करणे गरजेचे…. बाकी उद्याच्या भागात पाहूया….

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login