सोलापूर महानगरपालिकासोलापूर बातमी

सोलापूरातील पुना नाका दुर्घटना : रिक्षाचालक सतीश शिंदे २४ तासांनंतरही बेपत्ता, NDRF ची शोधमोहीम सुरू

सोलापूर शहरात रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे पुना नाका परिसरात मोठी दुर्घटना घडली. पावसाच्या जोरदार प्रवाहात रिक्षाचालक सतीश शिंदे हे पाण्याच्या लोटात वाहून गेले. घटनेला तब्बल २४ तास उलटून गेले असून, अद्यापही ते बेपत्ता आहेत.

घटनेनंतर तातडीने NDRF चे पथक, अग्निशमन दल व पोलिस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. गेल्या दोन दिवसांपासून सलग शोधमोहीम सुरू आहे. ड्रोनच्या साहाय्याने परिसराचे आकाशातून निरीक्षण केले जात असून, नदीकाठ, पुलाखालचा भाग, तसेच पाण्याचा प्रवाह ज्या दिशेने गेला त्या सर्व ठिकाणी काटेकोर तपासणी सुरू आहे. मात्र अद्याप रिक्षाचालकाचा ठसा लागलेला नाही.

या दुर्घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी उसळली असून, प्रशासनाला शोधमोहीमेतील अडथळे टाळण्यासाठी सतत संयमाचे आवाहन करावे लागत आहे.

दरम्यान, खासदार प्रणिती शिंदे यांनीही प्रशासनाशी संपर्क साधून शोधमोहीम जलद गतीने पार पाडावी, तसेच आवश्यक ते सर्व यंत्रणा वापराव्यात असे निर्देश दिले आहेत. शहरात अनेक ठिकाणी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, या घटनेने प्रशासनाच्या आपत्कालीन व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पावसाचा जोर कमी झालेला असला तरी नदी-नाल्यांमध्ये अजूनही पाणी साचलेले आहे. त्यामुळे शोधमोहीम अधिक आव्हानात्मक ठरत आहे. पुढील काही तासांत ड्रोन व बोटींच्या सहाय्याने पाण्याचा प्रवाह तपासला जाणार आहे.

अद्याप बेपत्ता असलेल्या रिक्षाचालकाच्या शोधासाठी संपूर्ण यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे…

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login