महाराष्ट्र

भारतातून 10 हजार बांधकाम मजूर जाणार इस्रायलला

जेरुसलेम, (इस्रायल) – इस्रायलमधील बांधकाम प्रकल्पांसाठी भारतातून तब्बल १० हजार बंधकाम मजूर इस्रायलला जाणार आहेत. दिनांक ७ ऑक्टोबर रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरू झालेल्या संघर्षामुळे तेथे बांधकाम मजूरांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे.

त्यामुळे या बंधकाम मजूरांना तेथे पाठवले जाणार आहे.

उद्योग विश्‍वातून या वृत्ताला दुजोरा दिला गेला आहे. हे १० हजार बांधकाम मजूर दर आठवड्याला ७०० ते एक हजार मजूरांच्या तुकडीमध्ये इस्रायलला रवाना होणार आहेत. इस्रायलच्या बिल्डर्स असोसिएशनने ही माहिती दिली आहे.

इस्रायल आणि हमासमधील संघर्ष सुरू होऊन चार महिने होऊन गेले आहेत. या काळात इस्रायलमधील प्रकल्पांवर पॅलेस्टिनी मजूरांना कामावर ठेवण्यास बंदी घातली गेली आहे. तसेच हजारो विदेशी मजूरांना घालवून देण्यात आले आहे. त्यामुळे इस्रायलमधील बांधकाम उद्योगात बांधकाम मजूरांची मोठी चणचण भासू लागली आहे. मजूर उपलब्ध नसल्यामुळे सुरू असलेले अनेक प्रकल्प रखडले आहेत.

बांधकाम उद्योगासाठी परदेशी मनुष्यबळाचा कोटा ३० हजारावरून ५० हजार करण्यात आला आहे आणि इस्रायल सरकारने गेल्या महिन्यात भारतातून १० हजार कामगारांना येण्यास मान्यता दिली आहे, असे इस्रायलमधील उद्योग विषयक नियतकालिकाने म्हटले आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login