महाराष्ट्रराजकीयलोकसभा बातमी 2024सोलापूर बातमीसोलापूर राजकीय

सोलापूर :राम सातपुते यांची बदनामी करणे भोवले ! काँग्रेसच्या राज सलगर यांच्यावर गुन्हा दाखल

सोलापूर लोकसभा महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांची सोशल मीडियावर मिम्स व्हायरल करून प्रतिमा मलिन केल्याप्रकरणी काँग्रेसचे कार्यकर्ता राज सलगर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांची जन मानसात प्रतिना मलीन व्हावी या हेतुने फेसबुकवर दि.24/03/2024 ते दि. 24/04/2024 या कालावधीत त्यांच्या विषयी सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकारणी काँग्रेस कार्यकर्ते राज सलगर यांच्यावर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.भाजपचे कार्यकर्ते समर्थ बंडे यांच्या तक्रारीवरून राज सलगर यांनी राम सातपुते आणि भाजप विरोधात मिम्स वायरल करून जनमाणसात प्रतिमा मलीन केल्याने भारतीय दंड संहिता कलम 500 आणि 501 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel