सोलापूर बातमीमहाराष्ट्रराजकीयसोलापूर राजकीय

देशमुख कुटुंबीय-फडणवीस यांच्यात बंद दाराआड चर्चा; शहरातील प्रश्नांवर सविस्तर संवाद

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारी सोलापूर दौऱ्यावर आले असताना त्यांनी सभेपूर्वी आमदार सुभाष देशमुख यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या भेटीमुळे स्थानिक राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली.
मुख्यमंत्री फडणवीस हे बार्शी येथील भगवंताच्या महापूजेनंतर हेलिकॉप्टरद्वारे सोलापूर विमानतळावर दाखल झाले होते. त्यानंतर त्यांनी थेट देशमुख यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी बाजार समितीचे संचालक मनीष देशमुख तसेच भाजपचे युवा नेते रोहन देशमुख यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचा सत्कार करून स्वागत केले.
यानंतर बंद दाराआड झालेल्या बैठकीत आमदार सुभाष देशमुख, मनीष देशमुख, रोहन देशमुख आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात सुमारे १५ ते २० मिनिटे सविस्तर चर्चा झाली. या चर्चेत सोलापूर शहरातील प्रलंबित प्रश्न, विविध विकासकामांची गती, पायाभूत सुविधांशी संबंधित मुद्दे तसेच स्थानिक राजकीय घडामोडींवर सखोल विचारविनिमय झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
विशेष म्हणजे, ही भेट कोणत्याही अधिकृत कार्यक्रमाचा भाग नसल्याने तिचे महत्त्व अधिक वाढले आहे. बंद दाराआड झालेल्या चर्चेतील मुद्दे गोपनीय ठेवण्यात आले आहेत
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या भेटीमुळे सोलापूरच्या राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले असून, देशमुख कुटुंबीयांच्या राजकीय हालचालींवरही सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे. आगामी काळात या भेटीचे परिणाम काय दिसून येतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

508 Insufficient Resource

The website is temporarily unable to service your request as it exceeded resouce limit. Please try again later.