सोलापूर अपघातसोलापूर निधन वार्ता
सोलापूर – विजेचा शॉक लागून 28 वर्षीय तरुचाणा मृत्यू…
सोलापूर – पाणी भरण्यासाठी पाण्याची मोटार लावत असताना विजेचा शॉक लागून 28 वर्षीय तरुचाणा उपचारापूर्वी मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवारी संध्याकाळच्या सुमारास घडली आहे. पंडित ज्ञानू गायकवाड वय 28 रा. हौसे वस्ती आमराई असे विजेचा शॉक लागून मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.
यात हकीकत अशी की आज सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास राहते घरी नळाला पाणी आल्याने पाणी भरण्यासाठी पाण्याची मोटार लावत असताना विजेचा शॉक लागून बेशुद्ध झाल्याने त्यास बेशद्ध अवस्थेत उपचारासाठी सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच पंडित ज्ञानू गायकवाड यास मृत घोषित केले आहे. या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकी येथे झाली आहे. घटनेची माहिती नातेवाईकांना मिळतात शासकीय रुग्णालयात नातेवाईकांनी गर्दी केली आहे.