सोलापूर बातमीsolapurpoliceमहाराष्ट्रसोलापूर सामाजिक

सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टवर पोलिसांची करडी नजर – नियम मोडल्यास तडीपारीची कारवाई

सोलापूर: नागपूर येथील घटनेनंतर सोलापूर शहर व ग्रामीण पोलिसांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी सायबर सेल पूर्णतः सक्रिय असून, व्हॉट्सअॅप, फेसबुक, स्नॅपचॅट, इन्स्टाग्राम यासारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर २४ तास निगराणी ठेवली जात आहे.

दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करणाऱ्यांवर कडक कारवाई

सोलापूर पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, कोणत्याही समाजात तेढ निर्माण होईल अशा पोस्ट शेअर करणाऱ्या किंवा प्रसारित करणाऱ्या व्यक्तींवर तात्काळ प्रतिबंधात्मक कारवाई केली जाईल. यासाठी पोलिस उपायुक्तांकडे विशेष अधिकार देण्यात आले आहेत.

कायदेशीर कारवाईचा धडाका

एखाद्याने दुसऱ्याच्या सांगण्यावरून आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास चॅप्टर केस दाखल करून संबंधित व्यक्तीकडून ६ महिने ते १ वर्षाचा “चांगल्या वर्तनाचा बॉण्ड” लिहून घेतला जाईल.

जर कोणी सातत्याने आक्षेपार्ह पोस्ट करत असेल तर त्याच्यावर २ वर्षांचा बॉण्ड लागू केला जाईल.

बॉण्ड उल्लंघन केल्यास ठरवलेल्या रकमेची वसुली केली जाईल.

वारंवार नियम तोडणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करून त्याला तडीपारीची कारवाई देखील भोगावी लागू शकते.

पोलिसांचा सततचा नजराणा

सोलापूर पोलिसांनी सोशल मीडियावर अशा प्रकरणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष सोशल मीडिया कक्ष स्थापन केला आहे. हा कक्ष २४ तास कार्यरत असून, कोणत्याही आक्षेपार्ह पोस्टवर त्वरित कारवाई केली जाईल.

पोलिस उपायुक्त विजय कबाडे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, सोशल मीडियावर जबाबदारीने वर्तन करावे आणि कोणत्याही प्रकारच्या द्वेषपुर्ण किंवा चिथावणीखोर पोस्ट टाळाव्यात. अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login