महाराष्ट्र

राज ठाकरे- CM शिंदेंच्या भेटीव, सदू – मधू एकमेकांचे अश्रू पुसण्यासाठी भेटले असतील -संजय राऊत

राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काल रात्री झालेली भेट म्हणजे सधू आणि मधूची भेट आहे. उद्धव ठाकरेंच्या मालेगाव येथील सभेनंतर दोघांच्या भावना उंचबळून आल्या असतील. त्यामुळे एकमेकांचे अश्रू पुसण्यासाठी दोघेजण भेटले असतील, असा टोला ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी लगावला आहे.

उद्धव ठाकरेंच्या सभेमुळे धास्तावले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंच्या भेटीबाबत पत्रकारांनी विचारले असता संजय राऊत म्हणाले, काल रात्री सदू-मधू भेटले त्यावर आम्ही काय बोलणार? दोघेही एकमेकांचे जुने मित्र आहेत. काल उद्धव ठाकरेंची मालेगावमधील विराट सभा पाहिल्यानंतर दोघांचे काही नव्याने उफाळून आले असेल. उद्धव ठाकरेंच्या सभेनंतर दोघांच्या भावना उंचबळून आल्या असतील. त्यामुळे एकमेकांचे अश्रू पुसण्यासाठी दोन्ही नेते भेटले असतील.

राज ठाकरेंचे मॅच फिक्सिंग

राज ठाकरेंवर टीका करताना संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष म्हणजे पिसे गेलेला कावळा आहेत. 18 वर्षांनंतरही राज ठाकरेंचे राजकीय पर्यटनच सुरू आहे. सध्या सत्ताधाऱ्यांसोबत त्यांचे मॅच फिक्सिंग सुरू आहे. तेच त्यांनी चालू द्यावे.

राहुल गांधींची भेट घेणार

दरम्यान, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान आम्ही सहन करणार नाही, असा इशारा काल जाहीर सभेत उद्धव ठाकरेंनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दिला होता. त्यावर संजय राऊत म्हणाले, मी आता दिल्लीला जात असून एक, दोन दिवसांत राहुल गांधी यांची भेट घेऊन त्यांना आमची भूमिका समजावून सांगणार आहे. वीर सावरकरांबाबत आम्ही सातत्याने भूमिका स्पष्ट केली आहे. याबाबत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांकडेही आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली आहे. जयराम रमेश यांच्याशीही मी चर्चा केली आहे. सावरकर हे आमच्यासाठी श्रद्धेचा विषय आहे. सावरकरांना माफीवीर म्हणणे, हे महाराष्ट्र कधीही स्वीकारणार नाही, हे महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनाही माहिती आहे.

मुख्यमंत्र्यांना काही कामच नाही

उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर मालेगावात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उत्तर सभा घेण्याची शक्यता आहे. यावर संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना काहीच काम नाही. त्यामुळे ते आता उत्तरच काय तर दक्षिण, आग्नेय, वायव्य अशा सर्व सभा घेतली. खरे तर मुख्यमंत्र्यांनी शेतकरी आत्महत्या का करत आहे?, हे समजून घ्यावे.

सुहास कांदेंवर शेलकी टीका

मालेगावमधील एक कांदा 50 खोक्यांना विकला गेला, अशी घणाघाती टीका काल उद्धव ठाकरेंनी सुहास कांदेंवर केली होती. त्यावर सुहास कांदेंनीही जोरदार पलटवार केला होता. उद्धव ठाकरेंची नार्को टेस्ट करा, म्हणजे त्यांनी कोणत्या कंपन्यांकडून खोके घेतले, हे समोर येईल, असा आरोप सुहास कांदेंनी केला होता. त्याला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, कालच्या मालेगाव येथील सभेत जनता यापुढे कोणाची नार्को टेस्ट करणार?, हे स्पष्ट झाले आहे. सुहास कांदेंच्या फालतु वक्तव्यावर मी बोलणार नाही.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia