सोलापूर बातमीराजकीयशैक्षणिकसोलापूर राजकीय

एक राज्य एक गणवेश योजनेचा पूर्ण फज्जा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य निदर्शने

महाराष्ट्रातील महायुती सरकारने प्राथमिक शालेय गणवेश व शालेय साहित्य वाटप अंतर्गत जाहीर केलेल्या एक राज्य एक गणवेश योजनेचा पूर्ण पज्जा उडाला आहे. म्हणून शालेय विद्यार्थ्यांना त्वरित गणवेश व शालेय साहित्य वाटप करा. यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय समोर सोलापूर महानगर प्रमुख विष्णू कारमपुरी (महाराज) यांच्या नेतृत्वाखाली व जिल्हाप्रमुख – प्रा.अजय दासरी, शहर प्रमुख – महेश धाराशिवकर, दत्तात्रय (पंत) वानकर, शरणराज केंगनाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य निदर्शने करण्यात आली.
या निदर्शने कार्यक्रमात महाराष्ट्रातील शिंदे,फडणवीस व पवार सरकारचा निषेध करण्यात आला त्याचबरोबर या योजनेचे टेंडर एका गुजराती कंपनीला देऊन वाढीव कमिशन मिळण्यासाठी प्रयत्न केल्यानेच विद्यार्थ्यांना अध्यापी गणवेश मिळू शकले नाही. शाळा सुरू होऊन १५ दिवस होत आहेत विद्यार्थी हे बिगर गणवेशात शाळेला जात असून याबाबतची कुठलीही लाज या सरकारला नाही. उलट गुजराती ठेकेदारांच्या सांगण्यावरून शालेय समितींना आणखी १ महिना मुदत वाढ सरकार मागत आहेत. या आंदोलनात विद्यार्थी – विद्यार्थिनींनी देखील केसरकर काका आमचे गणवेश कुठे आहेत. असे फलक घेऊन निदर्शनात सामील झाले होते. यावरून महाराष्ट्रातील भ्रष्टाचारी महायुती सरकार आता भ्रष्टाचार शिक्षण खात्यापर्यंत आणून ठेवले आहे. याचाही जाहीर निषेध सदर निदर्शनाच्या वेळी करण्यात आला आहे.
या निदर्शने कार्यक्रमात शिवसैनिक ,महिलां व विद्यार्थ्यांनी *शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, उद्धव साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है, आदित्य साहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, एक राज्य एक गणवेश योजना त्वरित रद्द करा, प्राथमिक विद्यार्थ्यांना त्वरित गणवेश मिळालेच पाहिजे, नाहीतर राजीनामा द्या राजीनामा द्या शिक्षण मंत्री राजीनामा द्या, खोके सरकार हाय हाय, विद्यार्थ्यांना गणवेश पासून वंचित ठेवणाऱ्या सरकारचा अधिकार असो, आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा, कोण म्हणतंय करणार नाही केल्याशिवाय सोडणार नाही. अशा घोषणा दिल्या
त्यानंतर माननीय जिल्हाधिकारी यांना जिल्हाप्रमुख अजय दासरी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाद्वारे शालेय गणवेश त्वरित वाटप करावे व इतर मागण्याचे निवेदन देण्यात आले सदर निदर्शने कार्यक्रमात वरील प्रमुख पदाधिकाऱ्यांसह संतोष पाटील, पूजा खंदारे, रेखा आडकी, स्वाती रुपनर, धनराज जानकर, बाळासाहेब गायकवाड, संदीप बेळमकर, लहू गायकवाड अनिल कोंडूर, रेवनसिद्ध बुक्कानुरे, सुरेश जगताप, सोमनाथ बंदपट्टे, अमित भोसले, विजय निली, सैदप्पा जंगडेकर, शेखर इराबत्ती, चंद्रकांत मानवी, अनिल दंडगुले, दत्ता माने, सुभाष सातपुते, सचिन गंदुरे, शिवा ठोकळे, बाळासाहेब पवार, मीनाक्षी गवळी, अण्णा गवळी, आबा सावंत, सुरेश शिंदे, दिलीप सगर, विजय मेटे, दीपक दुधाळ, वैशाली सातपुते, मारुती खानापुरे, राहुल परदेशी, आदी शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia