क्राईमसोलापूर क्राईमसोलापूर बातमी

सोलापुरात पुन्हा कोयत्याची दहशत, गुन्हा दाखल…

हातात कोयता घेऊन बार मध्ये दहशत ; दर महिन्याला मला दहा हजार रुपये दे नाही तर….. सोलापुरात घटना

सोलापुरातील एका परमिट रूम मध्ये हात कोयता घेऊन तोडफोड करीत खंडणी मागणाऱ्या एका विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. केदार प्रभु पुजारी, उत्तर कसबा, टिळक चौक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नागेश शिवाजी महानुर याच्या विरोधात फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी याने ०८/०७/२०२४ रोजी दुपारी १२.१५ वा चे सुमारास, विठ्ठल लॉजच्या बाजूला, निराळे वस्ती, मुरारजी पेठ, सोलापूर येथील रत्न परमिट रुम अॅन्ड बार मध्ये हातात लोखंडी कोयता घेवून येवून तुम्हाला धंदा करायचा असेल तर मला महिन्याला १०,००० रुपये दयावे लागेल, नाहीतर तुमचा धंदा चालु देणार नाही, असे म्हणून स्वतःचे हाताने दारु घेवून पिवुन टेबलवरील काचेचे ग्लास व काऊंटरवर ठेवलेले रॉयल स्टॅग, डिएसपी प्लेन, मॅकडॉल नंबर १, व इतर दारुच्या बाटल्या जमिनीवर फेकुन फोडुन तुम्ही पैसे देत नाही काय, तुम्हाला आज दाखवतो, असे म्हणून काऊंटर मधील २,४०० रु जबरदस्तीने काढुन घेतले आहेत. आरोपीच्या दहशतीला घाबरुन फिर्यादीच्या दुकानाचे आजुबाजुच्या व्यापाऱ्यांनी पळापळ करुन त्यांचे दुकान बंद करुन पळुन गेले आहेत म्हणून हा गुन्हा दाखल केला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक धायगुडे हे करीत आहेत.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel