शैक्षणिकसोलापूर बातमीसोलापूर सामाजिक

शाळांनी शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे महत्त्वाचे- आमदार जयंत तासगावकर

आजच्या स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर शाळांची गुणवत्ता वाढली पाहिजे, विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढली पाहिजे तरच आजचे विद्यार्थी स्पर्धेच्या युगात टिकतील आणि नवीन भारत घडवणारे खंबीर विद्यार्थी तयार होतील असे विचार पुणे विभागाचे शिक्षक आमदार प्राध्यापक जयंत आसगावकर यांनी मांडले .ते सोलापूर येथील सदसंकल्प शिक्षण समूहातील राष्ट्रसंत प्राथमिक शाळा आणि विश्वभूषण विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण करतेवेळी बोलत होते .अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक सचिव समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर हे होते. पुढे बोलताना आमदार आसगावकर म्हणाले की सदसंकल्प शिक्षण समूहाने आपली गुणवत्ता जगाच्या नकाशावर टिकविली असल्याचे दिसून येते कारण या शाळेचे माजी विद्यार्थी मोठमोठ्या शासकीय पदावर विराजमान झालेले दिसून येतात .शाळेचे सध्याचे विद्यार्थी वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये तालुका ,जिल्हा याबरोबरच राज्यस्तरावर ही चमकलेले दिसून येतात .
अध्यक्षस्थानावरून बोलताना समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर म्हणाले की सदसंकल्प शिक्षण संस्था आणि या संस्थेच्या सर्व शाळा वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी, पालकांच्यासाठी कार्यरत आहेत .सर्वच घटकातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे नवसमाज आणि नवीन भारत घडविणारे आणि पेलणारे विद्यार्थी तयार व्हावेत हा संस्थेचा मूळ हेतू आहे. यावेळी संस्थेच्या वतीने आमदार जयंत आसगावकर यांचा समाजभूषण भालशंकर यांच्या हस्ते शाल, पुष्प बुके देऊन यथोचित सन्मान करण्यात आला . कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेस आ आसगावकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक सत्यवान पाचपुडे यांनी केले ,सूत्रसंचालन रामचंद्र फडकडे यांनी केले तर मिलिंद भालशंकर यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाला शाळेतील विद्यार्थी ,शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel
Account Suspended
Account Suspended
This Account has been suspended.
Contact your hosting provider for more information.