सोलापूर बातमीसोलापूर सामाजिक
सोलापुरातील प्रसिद्ध उद्योजक तथा प्रियांका, रोहित व बडेमीया हॉटेलचे मालक सलीम शेख यांचे हृदय विकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले…

सलीम शेख यांचे निधन
सोलापूर : सोलापुरातील प्रसिद्ध उद्योजक तथा प्रियांका, रोहित व बडेमीया हॉटेलचे मालक सलीम शेख यांचे हृदय विकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले.
ते काँग्रेस अल्पसंख्याक युवक चे नजीब शेख यांचे वडील होत.
आज सांयकाळी ५:३० वाजता राहत्या घरी म्हणजेच सिव्हिल कोर्ट समोरील सुभान चेंबर्स मागील घरात त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला. त्यांच्यावर आज सोमवार दिनांक 28 एप्रिल रोजी रात्री ११ वाजता मोदी कब्रस्तान येथे दफन विधी करण्यात येईल.
ते काँग्रेस चे जुने कार्यकर्ते होते. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून ते ओळखले जात.



