लिटल एन्जल इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये गणतंत्र दिन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि वार्षिक पुरस्कार वितरण समारंभ यशस्वी

लिटल एन्जल इंग्लिश मिडियम स्कूल, रामवाडी, सोलापूर येथे 26 जानेवारी रोजी देशाचा 77वा गणतंत्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला । एडवोकेट सिराज शेख यांच्या करकमलांनी ध्वजारोहण झाले ।
या अवसरावर संस्थेचे अध्यक्ष हाजी अय्युब मंगलगिरी साहेब, उपाध्यक्ष डॉ. इलियास शेख साहेब, सचिव डॉ. उमर फारूक मुल्ला साहेब, डॉ. अब्दुल लतीफ साहेब, समन्वयक रियाझ एम. वलसंगकर, प्राचार्य शाहपुरे सर, जेष्ठ शिक्षक, उलमा अक्राम आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते।
ध्वजारोहणानंतर वार्षिक पुरस्कार वितरण समारंभाचे उद्घाटन शहरातील प्रसिद्ध एडवोकेट सिराज अहमद शेख यांच्या करकमलांनी झाले । या अवसरावर प्रसिद्ध फिजिशियन डॉ. अब्दुल लतीफ साहेब, सुप्रीम कोर्टचे एडवोकेट मोहम्मद उस्मान कोहीर साहेब, अलकुराण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष हाजी पैगंबर शेख साहेब, संस्थेचे ट्रस्टी आणि जिम्मेदार बशीर अहमद शाबदी साहेब, बर्कत अली जागीरदार साहेब, मुदस्सर सय्यद साहेब उपस्थित होते .
संस्थेचे अध्यक्ष आणि सचिव यांनी मेहमानांचे स्वागत केले । स्वागत केल्यानंतर पुरस्कार वितरणाची प्रक्रिया सुरू झाली । या शैक्षणिक वर्षात झालेल्या शैक्षणिक गतिविधी जसे की चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, भाषण स्पर्धा, आर्ट्स गणित विज्ञान प्रदर्शनी, फूड फेस्टिव्हल, अहादीस स्पर्धा, खेल स्पर्धा इत्यादीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, ट्रॉफी आणि पदके प्रदान करण्यात आली ।
त्याचप्रमाणे एसएससी परीक्षेत गेल्या 6 वर्षांपासून निरंतर 100% निकाल देण्यासाठी प्राचार्य सुफियान शाहपुरे सर, नफीसा नदाफ टीचर, शाइस्ता शेख टीचर, मुबश्शीरिन मुजावर टीचर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला आणि शबनूर मर्सनाली टीचर, तरन्नुम मजावर टीचर यांना उत्कृष्ट शिक्षण सेवाबद्दल आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला ।
तत्पूर्वी 25 जानेवारी 2025 रोजी शाळेत वार्षिक सामाजिक समारंभ आयोजित करण्यात आला होता ज्याचे उद्घाटन प्रसिद्ध कॅन्सर सर्जन डॉ. फहीम गोलीवाला, नूर एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष नजीर मुंशी साहेब, सोशल हाईस्कूलचे उपमुख्याध्यापक इम्तियाज शाबदी सर यांच्या करकमलांनी झाले ।
या अवसरावर विद्यार्थ्यांनी नैतिक मूल्ये आणि सामाजिक समस्यांवर आधारित सुमारे 28 गट एक्ट प्रस्तुत केले जे मेहमान आणि पालकानी खूप प्रशंसा केली। या सर्व गृप एक्ट ची निवड कारी अद्रीस मंगलगिरी साहेब यांनी केली होती आणि सर्व शिक्षकांनी त्यावर खूप मेहनत घेतली होती
गणतंत्र दिनाच्या अवसरावर भाषणे, वंदे मातरम गीत, अहादीस आणि त्याचे अनुवाद, सूरते आणि तफसीर, हम्द आणि नात प्रस्तुत करण्यात आले । या समारंभाला यशस्वी करण्यासाठी कारी अद्रीस साहेब, हाफिज सना अल्लाह, हाफिज इम्रान, कारी वसीम अकरम, हाफिज अद्रीस आणि विशेषतः मुज्जमील बर्ची सर आणि सर्व क्लास टीचर्स यांनी खूप मेहनत घेतली
संस्थेचे अध्यक्ष हाजी मोहम्मद अय्युब मंगलगिरी साहेब, सचिव डॉ. उमर फारूक मुल्ला साहेब, उपाध्यक्ष डॉ. इलियास शेख साहेब, इतर सदस्य, शाळाचे समन्वयक रियाझ वलसंगकर सर आणि प्राचार्य सुफियान शाहपुरे सर यांनी सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे समारंभाच्या यशस्वी आयोजना बद्दल अभिनंदन केले ।
एक उत्कृष्ट भोजनाने समारंभाची समाप्ती झाली।



